Tuesday 24 September 2013

वेब पत्रकारिता

माध्यम इंटरनेट
पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्काशी संबंधित चर्चा किंवा अभ्यासक्रम असला की त्याची सुरूवात हमखास उपलब्ध माध्यमांच्या प्रस्तावनेने होते. छापिल माध्यम अर्थात प्रेस वा प्रिंट मिडीया, मग रेडिओ, त्यानंतर दूरदर्शन, आणि पुढे अगदी चित्रपटापर्यंतच्या विविध माध्यमांचा उल्लेख त्या प्रस्तावनेत अपरिहार्यपणे होतो. वृत्तपत्रांचा जनमानसावरील प्रभाव, दूरदर्शनच्या प्रभावातून उद्भवलेले परिणाम वगैरे विषय अगदी शाळकरी प्रश्नपत्रिकेत सुद्धा निबंध लिहीण्याचे विषय म्हणून डोकावताना दिसतात. बातम्यांची माध्यमं म्हणून वृत्तपत्रे आणि दूरदर्शन पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. ह्या व अशासारख्या चर्चेच्या ओघात 'मेरा नंबर कब आयेगा' म्हणत हमखास दरवाजाबाहेर ताटकळत असतं ते इंटरनेट.

इंटरनेट हे माध्यम?
खरं तर वृत्तपत्र काय किंवा दुरदर्शनची एखादी वाहिनी म्हणजे चॅनल काय, त्यांच्या प्रसारणाला मूळातच भौगोलिक मर्यादा असते. देशातले अगदी सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र घेतले तरी ते जगातल्या प्रत्येक कानाकोपर्‍यात पोहोचू शकत नाही. ही व्यावहारिक मर्यादा जगातले प्रत्येक वृत्तपत्र मान्य करते. ह्याच मर्यादेवरचा एक उपाय म्हणून इंटरनेटवर वृत्तपत्रांच्या वेबसाईटस आपल्याला अपरिहार्यपणे दिसतात. वॉशिंग्टन पोस्ट किंवा न्युयॉर्क टाईम्स सारखं वृत्तपत्र मुंबई, पुणे गोव्यातल्या प्रत्येक इंग्रजी वाचकापर्यंत पोहोचणं जसं शक्य नसतं, तसच भारताचा टाईम्स ऑफ इंडिया किंवा लोकसत्ता वा गोमांतक न्यु जर्सीतल्या प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचणं अशक्य असतं. जगात कुठेही एखादं विशिष्ट वृत्तपत्र हाती पडलं नाही तरी त्या वृत्तपत्राची वेबसाईट त्या वाचकाची वाचनाची भूक भागवू शकते. म्हणजे, खरं तर इंटरनेट भौगोलिक दृष्ट्या वृत्तपत्राच्या एक पाऊल पुढेच असतं. वृत्तपत्राची ती मर्यादा त्याला कधीच अडवत नाही.
जो प्रकार वृत्तपत्रांच्या बाबतीत तोच दुरदर्शनच्या बाबतीतही आहेच. आजकल किंवा स्टार माझा वा मी मराठी सारख्या वाहिन्या जगभर दिसत नसल्या तरी इंटरनेटवरून त्यांचे प्रसारण जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचू शकते. दुरदर्शन वाहिन्यांना भौगोलिक मर्यादेबरोबर काळाची मर्यादाही असते. कालची बातमी पहायची तर एक दिवस अगोदरचा पेपर आपण रद्दीतून काढून पाहू शकतो. मात्र कालची बातमी आज पाहण्याची सोय दूरदर्शनवर नसते. कालची बातमी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केलेली नसेल तर ती उपलब्ध होणं दुरापास्त आणि काही वेळा अशक्यच असतं. इंटरनेटवर ह्या उलट परिस्थिती असते. न्युयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर आज १८५१ सालापासून ते आजतागायत म्हणजे २००८ सालापर्यंत प्रकाशित झालेल्या बातम्या तुम्ही पाहू शकता. थोडक्यात, काळ, वेळ आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण पृथ्वीतल व्यापून राहिलेले आजचे इंटरनेट हे माध्यम, प्रेस आणि टीव्ही सारखे स्वतंत्र माध्यम मानायलाच हवे.
३१ ऑगस्ट १९२० रोजी अमेरिकेत डेट्रॉइट (मिशिगन) येथे जगातले रेडिओवरचे पहिले बातमीपत्र प्रसारित केले गेले. भारतात रेडिओची खरी सुरूवात १९३६ साली झाली. १९२० ते १९३६ हा काळ १६ वर्षांचा आहे. १९३६ ते १९४७ ह्या काळात भारतात केवळ ८ आकाशवाणी केंद्रे सुरू झाली होती. म्हणजेच रेडिओ माध्यमाचा प्रसार आपल्या देशात कुर्मगतीने झाला. इंटरनेट मात्र आज अतिशय सुसाट वेगाने भारतात पसरत आहे, आणि जगात होणारी प्रत्येक तांत्रिक प्रगती आपल्यामध्ये सामावून घेत आहे. १९२० किंवा त्या लगतचा अगदी कालपर्यंतच्या काळात ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना कल्पनेतही आलेली नव्हती. आता ती भारतासह सर्वच राष्ट्रांमध्ये कमीअधिक झपाट्याने रूजते आहे. ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये एका गल्लीतला विकास दुसर्‍या गल्लीत व्हायला पूर्वीसारखा दशका दशकांचा वेळ लागत नाही. इंटरनेट हे भारतामध्ये १९९४-९५ मध्ये शहरी लोकांच्या घरात पोहोचले. पुढल्या दहा वर्षांत ते खेड्यापाड्यातही पोहोचले. आपल्याकडील इंटरनेटचा प्रसार हा वायर आणि तारांच्या तांत्रिकतेमध्ये अडलेला नाही. तो आपल्याकडील शिक्षणाच्या धीम्या गतीमुळे व ग्रामीण भागातील इंग्रजी भाषेच्या आकलनाच्या मर्यादांमुळे धीम्या गतीने होतो आहे.

सुपर माध्यमाची बीजे
छापलेले वृत्तपत्र हे कितीही गुळगुळीत आर्टपेपरवर छापलेले असले आणि डोळे दिपवणार्‍या बहुरंगी छायाचित्रांनी नटलेले असले तरी ते मुके असते. दुसरीकडे दुरदर्शन अगदी जिवंत दृश्य पहात आहोत एवढे प्रेक्षणीय असले तरी ती तशा दृश्यांची एक क्रमवारीने येणारी मालिका असते. न्युज अॅट टेन म्हणून बरोबर दहा वाजता सुरू झालेले दुरदर्शनवरचे वार्तापत्र काही मिनिटांनी पुढे गेले की ते मागे आणता येणे शक्य नसते. चुकलेली बातमी पुन्हा पंधरा मिनिटांनी वा अर्ध्या तासांनी जेव्हा पुन्हा दाखवली जाते तेव्हाच त्या दृश्यांचे दर्शन होते. दुरदर्शन संचावर अग्रलेख वाचता येत नाही, आणि घटना प्रत्यक्ष घडताना वृत्तपत्रात पहाता येत नाही. ह्या दोन्ही माध्यमांच्या त्या मर्यादा इंटरनेटच्या वेबसाईटला अडवू शकत नाहीत. वेबसाईटवर अग्रलेखही वाचता येतो आणि तीन मिनिटांपूर्वी दाखवले गेलेले दृश्य माऊसने एकदा क्लीक केलं की काही क्षणात डाऊनलोड होऊन समोर उलगडू लागते. म्हणजेच छापिल वृत्तपत्र आणि दुरदर्शन दोन्हींचे गुण एकत्र करणारे, व दोन्हींमधील दोषांना मागे सारून पुढे जाणारे माध्यम म्हणून इंटरनेट एकूण शर्यतीत पुढे येताना दिसते.
इंटरनेट प्रेस वा टीव्ही माध्यमांच्या दोषांवर उपाय देत पुढे सरसावते म्हणून त्याला कोणी सुपर माध्यम म्हणेल असे मात्र नाही. इंटरनेट उद्याच्या सुपर माध्यमाच्या दिशेने निश्चित वाटचाल करू शकेल असा एक महत्वाचा गुण त्यात आहे, तो गुण म्हणजे त्याची इंटरॅक्टीव्हीटी. वाचकांच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रे वा दुरदर्शनकडे जाण्यासाठी काही काळ जावा लागतो. वाचक कागदावर काहीतरी लिहील, तो कागद पोस्टाने वा फॅक्सने वृत्तपत्राकडे किंवा दुरदर्शनकडे पाठवील. त्यानंतर त्या वाचकाची ती प्रतिक्रिया जगापुढे येईल. वृत्तपत्र अशी किती पत्रे छापू शकेल, किंवा दुरदर्शन अशा किती पत्रांचा उल्लेख करू शकेल याला अनुक्रमे वृत्तपत्रातील जागा व दुरदर्शनवरील वेळेच्या मर्यादा आहेत. इंटरनेटवर बसलेला वाचक मात्र काही क्षणात कोणताही कागद न घेता, पोस्ट वा फॅक्सच्या नादी न लागता चटकन आपली प्रतिक्रिया (Comment) वेबसाईटवर नोंदवू शकेल. अशा असंख्य प्रतिक्रिया आल्या तरी त्यांना तिथे जागा कमी पडणार नाही, आणि कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी कोणालाही कुठेही त्या प्रतिक्रिया वाचता येतील. वाचकांच्या प्रतिक्रियांना काही क्षणात उत्तर देणे हेही लेखकाला अशक्य नाही. वाचक वा दर्शक आणि इंटरनेटचे माध्यम यातली ही थेट संवादाची सोय इंटरनेटला सुपर माध्यमाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.

भाषेच्या मर्यादाही मागे पडत आहेत..
इंटरनेट म्हंटलं की इंग्रजी अपरिहार्य आहे, आणि त्यामुळेच भारतासारख्या देशात त्यावर मर्यादा पडतील असं काल-परवापर्यंत वाटत होतं. मात्र हिंदी, मराठी किंवा अगदी बंगाली, तामिळ, तेलुगू सारख्या भाषांचे युनिकोड फाँटस उपलब्ध झाल्याने आज अक्षरशः हजारो वेबसाईटस आणि ब्लॉग्ज भारतीय भाषांतून सहजपणे तयार होताना दिसू लागले आहेत. मध्यंतरी जया बच्चन यांनी 'हम युपीवाले है, हम हिंदी में बोलेंगे' हे उदगार काढले आणि त्यावर गदारोळ उठला. ह्या प्रकरणात स्वतः अमिताभ बच्चनला काय म्हणायचय याबद्दल सर्वांनाच कुतूहल होते. अमिताभला जे म्हणायचे होते, ते अमिताभने भारताबाहेर असताना आपल्या ब्लॉगवर लिहीले. हा ब्लॉग अमिताभचा अधिकृत ब्लॉग असल्याने तो विश्वासार्ह होता. अमिताभ वृत्तपत्रांना वा वाहिन्यांना मुलाखतीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही, तरी ब्लॉगवरील त्याच्या स्वगतावरून सर्व वृत्तपत्रांनी व वाहिन्यांनी सविस्तर बातम्या दिल्या. जगभरात अक्षरशः लाखो लोकांनी तो ब्लॉग वाचला. आपल्या हजारो प्रतिक्रिया त्यावर नोंदवल्या. अमिताभचा हा ब्लॉग इंग्रजीत होता. मात्र ज्यांना चांगले इंग्रजी येत नाही, असे महत्वाचे पुढारी वा तत्सम महत्वाच्या व्यक्तींना आज हिंदी, मराठी वा तत्सम भाषेत आपला ब्लॉग तयार करणे आज शक्य आहे. इंटरनेटने इंग्रजी भाषेचा अडथळा मागे टाकला आहे ही बाब भारतासारख्या बहुभाषी देशाच्या दृष्टीने खरोखरीच क्रांतीकारक आहे.
इंटरनेटच्या बाबतीत डिजिटल डिव्हाईड च्या मुद्याबद्दल नेहमीच चर्चा होते. १९९५ साली भारतात आलेले इंटरनेट २००८ साली दुरदर्शनसारखे घराघरात गेलेले असेल असा दावा किंवा अपेक्षा कोणीच करणार नाही. त्यातही त्यातील भाषेचा वापर हा आजच्या पेक्षाही अधिक सुलभ होण्याची गरज आहे. भारतीय भाषांच्या युनिकोड तंत्राची प्रगती आजही पुढे सरकते आहे. २०१० सालापर्यंत तिला पुर्णत्व येईल अशी आशा बाळगली जात आहे.

सर्वसामान्यांची पत्रकारिता
वृत्तपत्रांतील वाचकांची पत्रे हा नेहमीच एक महत्वाचा भाग मानला जातो. कित्येकदा जेथे बातमीदार पोहोचत नाही अशा एखाद्या मुद्यापर्यंत एखादा वाचक पोहोचलेला असतो. तो पत्र लिहून ती बाब वृत्तपत्राला कळवतो तेव्हा आश्चर्याचे धक्के बसतात, आणि चक्रे वेगाने फिरतात. अशी उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. आता ह्या वाचकांच्या पत्राच्या पुढे नेणारी सर्वसामान्यांची पत्रकारिता किंवा सिटीझन्स जर्नालिझम जगभरात बहरताना दिसतो आहे. माध्यमांच्या दृष्टीने म्हंटले तर एकीकडे हे आव्हान आहे, तर दुसरीकडे ते एक वरदानही आहे. ज्या वृत्तपत्राकडे सिटीझन जर्नालिझमची जास्तीत जास्त शक्ती असेल, वा ज्या वाहिनीकडे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांकडून प्रत्यक्ष घेतलेल्या व्हिडिओ क्लीप्स येत असतील अशा वाहिनींची ताकद इतरांपेक्षा अधिक असणार आहे. प्रगत होत चाललेले तंत्रज्ञान एकीकडे सोपे आणि दुसरीकडे किंमतीला अतिशय स्वस्त व परवडण्याजोगे असल्यानेच सिटीझन जर्नालिझमचा प्रवाह दुथडी भरून वाहू लागणार आहे. शे दोनशेला मिळणारा डिजिटल कॅमेरा शेकडो छायाचित्रे घेऊ शकेल व त्यातली अनेक छायाचित्रे इंटरनेटवरून अपलोड होऊन क्षणार्धात वृत्तपत्रे व वाहिन्यांकडे पोहोचू शकतील. हाच प्रकार काही फरकाने व्हिडिओ कॅमेर्‍यांच्या बाबतीतही होणार आहे.

खर्‍या अर्थाने मल्टीमिडिया
सर्वसामान्यांची पत्रकारिता हे खरं तर उद्याचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून उभं राहण्याची शक्यता आहे. आजचे ब्लॉग्ज हे त्याच दृष्टीने वाटचाल करीत आहेत. वृत्तपत्रे व वाहिन्या देऊ शकणार नाहीत एवढा मजकूर, चित्रे, छायाचित्रे, विचार असा समृद्ध ज्ञानखजिना ब्लॉगचे माध्यम जगापुढे ठेवत जाणार आहे. इंटरनेटच्या पोटात अशा प्रकारची छोटी मोठी माध्यमं नांदत राहणार आहेत. त्यांचा थेट परिणाम आज ज्यांना आपण माध्यमं म्हणतो त्यावर होत जाणार आहे. प्रगत राष्ट्रांतील कित्येक दैनिक वृत्तपत्रांमध्ये आज दररोज वैशिष्ट्यपूर्ण वेबसाईटस व ब्लॉग्जची माहिती वाचकांना दिली जात असते. भाषिक वृत्तपत्रे त्या दृष्टीने आज मागे दिसतात. पण उद्या त्यांना हा भाग ठळकपणे द्यावाच लागणार आहे.

इंटरनेटच्या मर्यादा आणि उद्या
इंटरनेटचं ताकदवान माध्यम कोणत्याही मर्यादांविना उभं आहे असं चित्र मला इथे रंगवायचं नाही. हे मुद्दे निघाले की हमखास समोरून प्रश्न येतो, की आम्ही बसमध्ये वा रेल्वेगाडीत बसून वृत्तपत्र वाचत जातो. इंटरनेटचं तसं कुठे करता येतं? आरामखुर्चीत बसून इंटरनेटवरचा पेपर कुठे वाचता येतो? किंवा प्रकाशमान संगणकी स्क्रीनवरचं एक पान वाचलं की डोळ्यातून पाणी येऊ लागतं. ह्या इंटरनेटच्या आजच्या काही मर्यादा जरूर आहेत. मोबाईल फोनवर इंटरनेट दिसतं, ते कुठेही पहाता येतं असं मी म्हणणार नाही. कारण त्यात तर प्रचंड मर्यादा आहेत. पण एक लक्षात घ्यायला हवं की गरज ही शोधाची जननी असते. शास्त्रज्ञांचे आजचे प्रयत्न ई इंक आणि ई पेपर च्या दिशेने चालले आहेत. झेरॉक्स, मोटोरोला सारख्या कंपन्या गेली काही वर्षे अब्जावधी रूपये खर्च करून संशोधन करीत आहेत. ई पेपर २०१५ च्या आसपास प्रत्यक्षात येईल अशी चर्चा तज्ज्ञ आणि माहीतगार मंडळी करीत आहेत. ई पेपर असेल आपल्या रोजच्या पेपर सारखाच. संपूर्ण आकाराचा. उदबत्तीचा गोल आकाराचा सुरनळीसारखा बॉक्स असेल तशी सुरनळी ह्या पेपरची होईल. ती तुम्ही जवळ ठेवायची. दर पाच दहा मिनिटांनी त्यातला मजकूर व छायाचित्रे बदलत असतील. तुम्हाला वेळ मिळाला की पेपरची ती सुरनळी सरळ करायची. आलेली ताजी बातमी पहायची. सुरनळी परत ठेवून द्यायची. जे दैनिक हवे त्याची वर्गणी भरलेली असली की त्यावर त्या बातम्या आपोआप उमटत राहणार. ई इंक चे अतिसुक्ष्म कण त्या ई पेपरवर आपोआप इकडे तिकडे होऊन नवनवी अक्षरे, मथळे, छायाचित्रे रिमोट पद्धतीने त्यावर उमटणार. बातमीदार तसच काम करत असणार. अग्रलेख तसेच येत राहतील. लेख तसेच असतील. फक्त पेपर आणि इंक बदलेल.
आज हा सारा प्रकार वाचताना स्वप्नवत आणि अशक्यप्राय वाटतोय. ते स्वाभाविक आहे. पण हे स्वप्न सत्याकडे वाटचाल करत हे देखील वास्तव आहे. ह्या दृष्टीने चाललेले अनेक प्रयोग यशस्वी होत आहेत. विज्ञानाची झेप मानवी मेंदूच्या पलिकडची असते. फॅक्स किंवा दुरदर्शनची कल्पना अठराव्या -एकोणीसाव्या शतकात अशक्यप्रायच वाटली होती. पण विसाव्या शतकात ते वास्तवात आलं. आपण माध्यमांची चर्चा आज करतोय ती आजचे संदर्भ डोक्यात घेऊन. उद्याचे प्रगत संदर्भ डोक्यात घेतले की वाटतं आपला ई पेपर उघडला की पहिल्या पानावर आलेली ताजी बातमी त्यावरची व्हिडिओ क्लीप पहात आपल्याला वाचता येईल. अशा वेळी प्रेस मिडीया विरूद्ध टीव्ही मिडीया अशी विसाव्या शतकात झालेली ऐतिहासिक चर्चा ऐकून हंसू आल्याशिवाय राहणार नाही.
एक मात्र नक्की, की माध्यमांचे दृश्य बदलले तरी त्याचा आत्मा बदलणं विज्ञानाच्या ताकदीबाहेरचं आहे. माणसाची चाल पायावरच राहणार आहे. आजचा कागदी पेपर असो की उद्याचा ई पेपर माणसाची चाल पायांनी आणि विचार डोक्यातूनच येत राहणार आहे. ई पेपर आल्याने माध्यमांच्या भूमिकेत मोठा बदल संभवतो अशी चर्चा मात्र जगभर कुठेही चाललेली दिसत नाही.

माधव शिरवळकर

Sunday 22 September 2013

डॉ.भीमराव रामजी आंबेडकर


जन्म- १४ एप्रिल, १८९१ (महू, मध्य प्रदेश)

मृत्यू- ६ डिसेंबर, १९५६ (दिल्ली)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन पणाला लावलं असे थोर तत्वज्ञ आणि राजकीय नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान निर्विवाद आहे. बाबासाहेबांचा जन्म १४ एपिल १८९१ रोजी महु या गावी एका अस्पृश्य कुटुंबात झाला. अस्पृश्य कुटुंबात जन्मल्यामुळे लहान वयापासून अन्यायकारक प्रथेचा अनुभव येत गेला. त्यांचे वडिल लष्करात सुभेदार मेजर होते, भीमराव आंबेडकरांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एलफिन्स्टन हायस्कूल व महाविद्यालयात झाले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी बडोदे संस्थानात नोकरी पत्करली. पण तिथे सुद्धा पदोपदी जातीच्या नावाखाली हेटाळणी होत असे. याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी ती नोकरी सोडून, मुंबईतल्या सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यपकाची नोकरी स्वीकारली.

अन्याया विरुद्ध आवाज उठवून, अस्पृश्यांचा उद्धार हेच त्यांनी आपले जिवीत कार्य मानले. त्यासाठी आंबेडकरांनी अस्पृश्य कार्यकर्त्यांची संघटना उभारण्यास सुरुवात केली. १९१९ पासून त्यांचा सार्वजनिक जीवनात वावर सुरु झाला आणि अस्पृश्य समाजाच्या जागृतीचं आणि संघटनाचं कार्य करुन ते दलितांचे नेते म्हणून ही ओळखले जाऊ लागले.१९२० मध्ये त्यांनी मुंबई येथून “मूकनायक” नावाचे पाक्षिक सुरु केले. त्याच वर्षी कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्यांची माणगांव येथे परिषद आयोजित केली. तर नागपूरला छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली आखिल भारतीय परिषद ही बोलावली, लोकजागृतीचं कार्य सुरु असतानाच स्वत:चे अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याकरिता ते इंग्लंडला गेले. आणि लंडन विद्यापीठाची डी.एस.सी. ही दुर्लभ पदवी संपादन करुन बॅरिस्टर झाले.

१९२४ मध्ये त्यांनी “बहिष्कृत हितकारिणी” ही संस्था स्थापन केली. “शिकवा, चेतवा व संघटित करा”हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. १९२७ मध्ये महाडच्या चवदार तळ्यावर सर्वसामान्यांप्रमाणे अस्पृश्यांनाही पाणी भरता यावे यासाठी त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला व त्याच वर्षी अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी “मनुस्मृती” आणली.

अस्पृश्यांना इतर भक्तांप्रमाणे देवाचे दर्शन घेता यावे यासाठी १९३० साली. काळाराम मंदीर प्रवेशासाठी सत्याग्रह ही केला, त्याचं नेतृत्व त्यांनी स्वत: केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते, तिथे त्यांनी अस्पृश्यांची बाजू अगदी हिरहिरीने मांडली; त्यांची स्वतंत्र मतदार संघांची मागणी ही मंजूर झाली. पण यामुळे म.गांधी आणि डॉ. आंबेडकर मध्ये मतभेद निर्माण झाले, त्यामुळे गांधीजींनी उपोषण आरंभले.

१९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. प्रांतिक विधीमंडळाच्या झालेल्या निवडणूकीमध्ये ते प्रचंड बहुमतांनी निवडून आले.

१९४१ साली त्यांनी “ऑलइंडिया शेड्युलकास्ट फेडरेशन” नावाच्या देशव्यापी पक्षाची स्थापना करुन, अस्पृश्यांसाठी अनेक लढे ही दिले. तसंच अन्याय ग्रस्त समाज घटकांचं एक व्यापक पक्ष म्हणून स्थापना करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला होता. त्याचं नाव “रिपब्लिकन पक्ष” असं ठरवण्यात आलं होतं, पण या पक्षाची स्थापना बाबासाहेबांच्या मृत्यू नंतर म्हणजे १९५७ साली करण्यात आली.

१९४२ ते १९४६ या कालखंडात बाबासाहेब व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री होते, भारत स्वतंत्र झाल्यावर ते केंद्रीय मंत्रिमंडळात विधी मंत्री झाले. भारतीय राज्यघटनेच्या निमिर्ती मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, सोबतच ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते, अथक परिश्रम पणाला लावुन त्यांनी संविधनाचा मसुदा तयार केला होता, म्हणूनच त्यांना राज्यघटनेचे आदिशिल्पकार मानण्यात आलं आहे.

वाचन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यासंग होता. ग्रंथाशिवाय आपण जगूच शकणार नाही असे त्यांना वाटे. त्यांच्याकडे दुर्मिळ अशा २५ हजार ग्रंथांचा संग्रह होता, बाबासाहेबांनी लिहिलेले अनेक ग्रंथ ही विचार प्रेरक आहेत.

आंबेडकरांच्या व्यासंगाचे व संशोधनकुशलतेचे प्तीक असलेला ग्रंथ म्हणजे “हु वेअर शुद्राज” तर त्यांचे “द अनटचेबल्स” या नावाचे पुस्तक ही उल्लेखनीय आहे. जातीय संस्थेमुळे हिंदूधर्म पोखरला गेला आहे, अशी बाबासाहेबांची ठाम समजूत होती. धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यांवरील त्रास व अन्याय दूर होणार नाही, अशी पक्की धारणा झाल्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या अनेक अनुयायांसह नागपूर येथे बौध धम्माची दीक्षा घेतली. त्यानंतर बौध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठीचे कार्य हाती घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी, तसंच राजकीय आणि सामाजिक चळवळींनी प्रचंड क्रांतिकारी कार्य ही केले. त्यामुळेच शतकानुशतके मुक असणार्‍या एका मोठ्या समुदायाला बाबासाहेबांच्या रुपाने वाचा मिळाली.

भारताचे एक द्रष्ट नेते, श्रेष्ठ कायदेपंडित, तळा गळातील जनतेचा नेता आणि “एक विद्वान महामानव” अशा अनेक रुपांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची किर्ती आणि स्मृती चिरंतन रहाणार आहेत. ६ डिसेंबर १९५६ ला त्यांच महानिर्वाण झालं, त्यानंतर भारताचं सर्वोच्च असा “भारत रत्न” हा सन्मान मरणोत्तर बहाल करण्यात आला.

प्रकाश गोपाळराव पोहरे


महाराष्ट्रातील २० शहरांतून प्रसिद्ध होणार्‍या `दैनिक देशोन्नती' या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य संपादक.

`दैनिक देशोन्नती' हे महाराष्ट्रातील ५ व्या क्रमांकाचे तर विदर्भातील दुसर्‍या क्रमांकाचे दैनिक आहे. याचबरोबर त्यांनी कमी खर्चाच्या शास्वत शेतीला वाहिलेले `साप्ताहिक कृषकोन्नती' सुरु केले असून शेती या विषयावर हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे साप्ताहिक आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी सुरु केलेले हिंदी दैनिक `राष्ट्रप्रकाश' हे मराठी संपादक/मालकाचे पहिलेच हिंदी दैनिक आहे. श्री प्रकाश पोहरे यांचा जन्म दि. १७ मार्च १९५४ रोजी अकोला येथे झाला. १९८० ते १९९४ ही तब्बल १४ वर्षे ते शेतकरी संघटनेमध्ये अत्यंत सक्रियरित्या सहभागी होते. या काळात त्यांनी राज्यात अनेक सभा व आंदोलने गाजवली. १९९३ मध्ये त्यांनी कापूस सीमापार या आंदोलनाचे नेतृत्तव केले. परिणामी कापसाला २४०० रुपये भाव मिळाला.

`प्रहार' हा त्यांचा स्तंभ फार लोकप्रिय असून त्यातील लेखांचे संकलन एकूण चार पुस्तकांतून केले गेले आहे. त्यांची एकूण ९ पुस्तके प्रकाशित झाली असून दैनिक देशोन्नतीमधील १९९४ ते २०१० या १६ वर्षातील निवडक अग्रलेखांचे १० खंड प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. या सर्व पुस्तकांच्या मिळून जवळपास ५०००० प्रतिंची विक्री झाली आहे. श्री प्रकाश पोहरे हे महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्ष आहेत. त्यांना पत्रकारीतेतील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. श्री प्रकाश पोहरे यांच्याविषयी अधिक माहितीसाठी त्यांच्या http://www.prakashpohare.com या साईटला भेट द्या . `प्रहार' या स्तंभातील निवडक लेख मराठीसृष्टीच्या `लेखसंग्रह' या विबागात उपलब्ध आहेत.

पराग करंदीकर

पराग करंदीकर हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व प्रथितयश पत्रकार असून महाराष्ट्र टाईम्स, सकाळसारख्या नामांकित व पुणे-मुंबईसारख्या महानगरांमधील नागरिकांचे मतप्रवाह ठरविणार्‍या वृत्तपत्रांसाठी वृत्तसंकलनाचे काम करून त्यांनी या क्षेत्रातील विपुल अनुभव गाठीशी जमविलेला आहे. सध्या महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रासाठी निवसी पत्रकाराचे काम करताना ते बेनेट कोलमॅन अँड कंपनीमध्ये कार्यरत असुन आपल्या आभ्यासपुर्ण लेखनाचा व
अचुक माहिती संकलनाचा सुरेख संगम करीत त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा अगदी ठसठशीत ठसा त्यांनी येथे उमटविला आहे. करंदीकरांचे शैक्षणिक आलेख बघितला, तरी त्यांच्या आतील अष्टपैलु व सृजनशील विद्यार्थ्याची सहज प्रचिती येईल, इतक्या विभीन्न प्रातांना व पाउलवाटांना एक विद्यार्थी म्हणून चोखंदळले आहे. 'डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरींग' हा कोर्स करून एका इंजिनीअराची प्राथमिक घडण, आर्टस क्षेत्राती राज्यशास्त्र या विषयातील पदवी मिळविलेला पदवीधर, व रानडे इन्स्टिट्युट मधून 'मास्टर्स इन जर्नालिसम अँड कम्युनिकेशन' ही पत्रकारिता कौशल्यांना सबळ व सक्षम करणारी डिग्री मिळविणारा तज्ञ, अशी एक विद्यार्थी म्हणूनच त्यांची मुळे फार खोलवर रूतलेली आहेत. कस्रो वाडिया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या प्रथितयश संस्थेमधून ते डिप्लोमा इंजिनीअर झाले तर परशुराम भाऊ कॉलेज पुणे या नामांकित कॉलेजमधून कला क्षेत्रातील पदवीधर झाले .त्यांच्यातील खर्‍या पत्रकाराची जडण घडण तर कॉलेजच्या दिवसांपासूनच झाली. पत्रकारिता हे त्यांच व्रत आहे, अन्यायाला तोंड फोडण्यासाठी त्यांनी निवडलेलं शस्त्र आहे हे त्यांच्या आतापर्यंतच्या अत्यंत तत्पर व पारदर्शी वाटचालीमधून सिध्द होतं आलयं. कॉलेजच्या दिवसांपासून त्यांच्या हाताला चिकटलेली लेखणी आजवर कधीही म्यानस्थ झ ालेली नाही. उलट ती आजच्या आव्हानात्मक व भ्रष्टाचाराने वेढलेल्या जगामध्ये अधिकच तावून सुलाखून निघालेली आहे. निर्भीड विचारसणीचे व विज्ञानवादी दृष्टीकोनाचे पुरस्कर्ते असलेल्या करंदीकरांनी साहाय्यकारी संपादक पुणे शहर, सकाळ मिडिया ग्रुप येथे, सकाळ पेपर्स लिमीटेड साठी अहवालकर्ता म्हणून, तर सकाळसाठीच क्रिडा विभागाचे उपसंपादक व प्रमुख रिपोर्टर म्हणून काम केले आहे. आपले पदव्योत्तर शिक्षण त्यांनी एन. एम. व्ही. कॉलेजमधुन पुर्ण केले.

दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर

जन्म - १ डिसेंबर १८८५ ,
मृत्यू - २१ ऑगस्ट १९८१

दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर, उर्फ आचार्य कालेलकर उर्फ काकासाहेब कालेलकर; हे थोर स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक, इतिहासकर, शिक्षण तज्ञ, पत्रकार, साहित्यिक तसंच भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक तथा गांधीवादी म्हणून परिचित आहे.

काकासाहेब कालेलकरांचा जन्म १ डिसेंबर १८८५ साली सावंतवाडीच्या बेलगुंडी या गावी झाला.फर्ग्युसन महाविद्यालयातुन शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्यांनी “राष्ट्रमत” या दैनिकात संपादकीय विभागात काम केलं. त्यानंतर बडोदा येथील गंगाधर विद्यालयात कालेलकर शिक्षक म्हणून रुजू झाले, पण “या विद्यालयात सरकार विरोधी कारवाया चालतात” असे कारण दाखवून ब्रिटीश सरकारने हे विद्यालय बळजबरीने बंद केले.
“गंगाधर विद्यालय” बंद झाल्यावर काकासाहेबांनी महात्मा गांधीजींच्या गुजराथ येथील साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. तिथे असतानाच त्यांनी “सर्वोदय” या महात्मा गांधीजींच्या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिलं. हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी मोलाचं योगदान बजावलं, त्यासाठी हिंदुस्थानी प्रचार सभेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवला. भारत देशाचं ऐक्य टिकून रहाण्यासाठी हिंदी भाषेच्या प्रचाराची नितांत आवशक्यता असल्याचं ते मानत, त्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण ही केले. 
महात्मा गांधीजींच्या प्रेरणेमुळे साकारलेल्या गुजराथ विद्यापिठाच्या स्थापनेत काकासाहेब कालेलकरांनी महत्वाची भूमिका पार पाडली. काही काळ कालेलकर गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरु ही होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे १९५३ साली “मागास वर्गीय आयोग” नेमण्यात आला होता, काकासाहेब कालेलकर या आयोगाचे अध्यक्ष होते. १९५५ ला या आयोगाने आपला अहवाल सरकारला केला. या अहवालात दलित तसंच अस्पृश्यांसाठी अ नेक कल्याणकारी योजनांची शिफारस करण्यात आली होती.

काकासाहेब कालेलकरांनी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती जनतेने सुद्धा त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले, कालेलकरांना गुजराती लोकं आदराने “सवाई गुजराती” म्हणत असत. काकासाहेब कालेलकरांनी लेखन आणि शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारने १९६४ साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले, तर कालेलकरांच्या साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामासाठी १९६६ साली “जीवन व्यवस्था” या गुजराती भाषेतील निबंध संग्रह साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. तर १९७१ साली “साहित्य अकादमीचे सदस्यत्व” ही बहाल करण्यात आले. २१ ऑगस्ट १९८१ साली वयाच्या ९६ व्या वर्षी काकासाहेब कालेलकरांच वृद्धापकाळाने निधन झाले.

हेमंत देसाई

हेमंत देसाई हे गेली जवळपास ३६ वर्षं पत्रकारितेत आहेत. मराठी दैनिकात आर्थिक पत्रकारितेचा अध्याय सुरू करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात ज्येष्ठ सहायक संपादक म्हणून, तसंच महाराष्ट्र टाइम्स मध्ये एकूण २६ वर्षं काम केले. या काळात सदर वृत्तपत्राच्या जडणघडणीत महत्त्वाचा योगदान असून अग्रलेख, वैचारिक लेखनशैलीसाठी ख्याती आहे.
त्याचप्रमाणे लोकमत,सकाळ, महानगर, प्रभात, नवशक्ति, महानगर सारख्या वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन ही केलेलं आहे.तर साधना साप्ताहिकात चार वर्षे सदर व अग्रलेखही लिहिले. तसेच बाबू मोशाय या टोपणनावाने चित्रपटविषयक लिखाण. संशोधन, अभ्यासू वृत्ती हेमंत देसाईंच्या वैशिष्ट्य म्हणता येईल.कोणत्याही प्रकारची भीडभाड न ठेवता परखड लेखन व बोलण्यासाठी प्रसिद्ध. आक्रमक व वैचारिकता यांची सांगड घालून लेखन व भाषणे राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रश्नांवर लेखनाबरेबरच ठिकठिकाणी व्याख्याने. राजकीय व सामाजिक विषयांचे अभ्यासक म्हणून व वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानमालांमधून व्याख्याने दिली आहेत यामध्ये पुण्याची वसंत व्याख्यानमाला, संगमनेरची अनंत फंदी, मिरज व गडहिंग्लज येथील वाचनालयांच्या व्याख्यानमाला या व इतर ब-याच ठिकाणी व्याख्याने दिली असून, अनेक टीव्ही चॅनेल्सवरूनही विश्लेषणात्मक चर्चांमधून सहभाग घेतला आहे. बऱ्याच स्वयंसेवी संस्थांशी संबंध. पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीशी जवळचे नाते जोडून काम. विविधांगी लेखनासोबतच कथालेखनही चालू. भोवळ कादंबरीही दिवाळी अंकातून प्रकाशित झाली असून ती पुस्तकरूपात प्रसिध्द झाली आहे. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांसाठी अध्यापन ही केलं असून माध्यम क्षेत्रातील त्यांचे अनेक विद्यार्थी आज महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.
सण्डे के सण्डे, बोई बगाल, जलसाघर, तारकांचे गाणे, शहेनशहा अमिताभ, विदूषक, चांदरात ही बाबू मोशायलिखित आणि आपला अर्थसंकल्प, कंगालांचे अर्थशास्त्र व सारथी ही हेमंत देसाई नावाने लिहिलेली पुस्तके प्रकाशित. त्यांचा ‘बोई बंगाल’ या पुस्तकास राज्य वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झाला असून,आणखीही काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर. चित्रपटसंगीतविषयक ‘सुहाना सफर’ व राजकीय लेखसंग्रह ‘डावपेच’ प्रसिद्ध झाला आहे.

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

जन्म-२५ नोव्हेंबर, १८७२ मृत्यू- २६ ऑगस्ट, १९४८ 
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते. 'केसरी'चे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले.'नवाकाळ' या वृत्तपत्राचे ते संस्थापक आहेत.

बाळशास्त्री जांभेकर

जन्म- ६ जानेवारी, १८१२
मृत्यू- १८ मे, १८४६

बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतले आद्य पत्रकार होते. त्यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र जानेवारी ६, १८३२ रोजी सुरू केले.
त्यांचा जन्म राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले गांवी झाला होता. इंग्रजी राजवटीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. त्याच जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वय अवघे २० वर्षे होते. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश सरकारपर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्रजी भाषेत असायचा.वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. दर्पण सुमारे साडेआठ वर्षं नियमितपणे प्रकाशित होत होते. त्याच्या शेवटच्या अंकाचे प्रकाशन जुलै १८४० मध्ये झाले. तत्कालीन सामाजिक समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले जावे, तसेच समाजात जागृती होऊन बालविधवांच्या पुनर्विवाहास मान्यता मिळावी इ. विषयांवर वृत्तपत्रांतील संपादकीय लेखांचा भर असे.
जांभेकरांनी वाचनालयांचे महत्त्व ओळखून 'बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी' ची स्थापना केली. मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी १८४० साली सुरू केले होते. 'दिग्दर्शन' मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत. 'एशियाटिक सोसायटी' या त्रैमासिकांत शोध निबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी १८४५ मध्ये काढली होती. मराठी, संस्कृत, इंग्लिश, हिंदी, गुजराथी, कानडी, फारसी बरोबरच ग्रीक व लॅटिन भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात हिंदीचे अध्यापन करीत. त्या काळात त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत.
पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे आपला समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवले की, नुसते महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही. संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. श्रीपती शेषाद्री नावाच्या एका मुलाला त्यांनी योग्य रस्ता दाखवला, आणि मग त्यांना असे वाटले की, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र सुरू केले पाहिजे. आणि त्यांनी ’दर्पण’ सुरू केले. मराठीतले ते आद्य पत्रकार. त्यांनी प्रकाशित केलेल्या साहित्यांत 'नीतिकथा', 'इंग्लंड देशाची बखर', 'इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप', 'हिंदुस्थानचा इतिहास', 'शून्यलब्धिगणित' या ग्रंथांचा समावेश आहे. जानेवारी ६ हा 'दर्पण' वृत्तपत्राच्या प्रथम प्रकाशनाचा दिवस (आणि योगायोगाने जांभेकरांचा जन्मदिन) महाराष्ट्रांत 'पत्रकारिता दिवस' म्हणून साजरा होतो. बाळशात्री जांभेकरांवर 'युगप्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर- काळ आणि कर्तृत्व' लेखिका: नीला उपाध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. मराठी भाषेतील पहिले मराठी वृत्तपत्रकार, भाषांतरकार, शिक्षणतज्ज्ञ, गणिततज्ज्ञ, निबंधकार बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांच्या संपादनाखाली ‘दर्पण’चा प्रथम अंक मुंबईत प्रकाशित झाला. त्यांचे वडील व्युत्पन्न पुराणिक होते. त्यामुळे साहजिकच ते भिक्षुकीचा व्यवसाय करत असत. त्यांनी आपल्या मुलास १८२५ च्या दरम्यान मुंबईत बापू छत्रे यांच्याकडे इंग्रजी शिकण्यासाठी पाठवले. दुसर्‍याच वर्षी बाळशास्त्री नेटीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी शाळेत दाखल झाले. पाच वर्षांत तेथील अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी संस्कृत, इंग्रजी व मराठी या भाषांवर प्रभुत्व मिळवले. तसेच गणित व इतिहास या विषयातही प्रावीण्य मिळवले. १८२९ मध्ये एल्फीस्टन हायस्कूलमध्ये त्यांची नेमणूक झाली. १८३४ मध्ये ते असिस्टंट प्रोफेसर बनले. मधल्या काळात अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून त्यांनी २० महिने काम केले. प्राध्यापक अर्लिबार यांच्या हाताखाली गणित-ज्योतिषादी शास्त्रांचा अभ्यास केला. बंगाली, गुजराती, कन्नड, तेलगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन इ. भाषांवर प्रभुत्व मिळवले. प्राचीन लिपीशास्त्राचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख, ताम्रपट यावर शोधनिबंध लिहिले. मुंबईच्या फोर्ट भागातील ज्युनियर कॉलेजच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली. तेथे वाङ्मय व विज्ञान हे विषय ते शिकवत. १८४५ मध्ये सरकारने स्थापन केलेल्या नॉर्मल स्कूलचे ते अध्यक्ष होते. दादाभाई नौरोजी, केरूनाना छत्रे इ. नामवंत त्यांचे विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांची ज्ञान जिज्ञासा वाढावी म्हणून त्यांनी काही पुस्तकेही लिहिली. ‘नितीकथा’, ‘सारसंग्रह’, ‘इंग्लंड देशाची बखर’, ‘भूगोल विद्या’, ‘गणितभाग’, ‘बालव्याकरण’ इ. तसेच १८४५ मध्ये त्यांनी प्रथमच ज्ञानेश्वरी मुद्रित स्वरूपात वाचकांच्या हाती दि ी. १८३२ मध्ये बाळ शास्त्री यांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र इंग्रजी आणि मराठी भाषांमधून सुरू केले. मराठीतील हे पहिले वर्तमानपत्र. मराठीतील या पहिल्या मासिकाचे संपादनही त्यांनीच केले.
विद्वान व बहुआयामी व्यक्तित्त्व असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचे अवघ्या पस्तीसाव्या वर्षी १७ मे १८४६ रोजी निधन झाले.

अरूण साधू


अरूण साधू हे मराठी भाषेतील प्रख्यात लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरिक्षक व समीक्षक आहेत. त्यांनी रशिया तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थेवर विवेचक लेखन केले आहे. त्यांच अत्तापर्यंत प्रकाशित झालेलं साहित्य कादंबर्‍या मुंबई दिनांक । सिंहासन । बहिष्कृत । शापित । स्फोट । विप्लवा । त्रिशंकू । शोधयात्रा । तडजोड । झिपर्‍या । मुखवटा कथासंग्रह एक माणूस उडतो त्याची गोष्ट । बिनपावसाचा दिवस । मुक्ती । मंत्रजागर । बेचका ;;ग्लानिर्भवति भारत नाटक पडघम ललित लेखन तिसरी क्रांती समकालीन इतिहास जेव्हा ड्रॅगन जागा होतो । आणि ड्रॅगन जागा झाला । फिडेल चे आणि क्रांती । तिसरी क्रांती शैक्षणिक संज्ञापना क्रांती भाषांतर शुभमंगल (कादंबरी)

उत्तम कांबळे


जन्मतारीख : 31 मे 1956.

उत्तम कांबळे हे कुटुंबातील शिकलेली पहिली व्यक्ती. त्यांची आई शेतमजूर होती. घरात हालाखिचे दिवस होते. हातावर पोट चालणार घर.. त्यामुळे उत्तम कांबळे यांनी कंपाऊंडर, विक्रेता, हमाली, बांधकाम मजूर, ओरडून पेपर विकणे आदी सर्व कामे करत आपलं शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीचे टक्के टोणपे खात..त्यांनी स्वत:ला घडविले... पत्रकार..संपादक..लेखक म्हणून आता त्यांना जग ओळखते... त्यांनी ठाणे येथे झालेल्या ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्षपदही भुषविले... त्यांची काही विस्तारीत माहिती.

कौटुंबिक माहिती : पत्नी लता (शिक्षिका), चार्वाक व आशय हे दोन मुलगे, तसेच आई, भाऊ, बहिणी.

व्यवसाय : पत्रकार.

अनुभव :
* दै.समाज, कोल्हापूर (1979 ते 1982)
* बातमीदार, सकाळ, कोल्हापूर (1982)
* उपसंपादक (1 एप्रिल 1983 ते 30 जून 1987)
* ज्येष्ठ उपसंपादक (1 जुलै 1987)
* वृत्तसंपादक, सकाळ (नाशिक) 29 ऑगस्ट 1989.
* कार्यकारी संपादक, सकाळ (नाशिक) 21 जुलै 1992.
* संपादक : 1 मे 1994 ते 15 ऑगस्ट 2005)
* संपादक - न्यूज नेटवर्क (16 ऑगस्ट 2005 ते 9 मे 2009)
* संपादक - सकाळ माध्यम समूह (10 मे 2009 पासून)

अध्यापनाचा अनुभवः
1.शिवाजी विद्यापीठात वृत्तविद्या विभागात दोन वर्षे.
2. नाशिकच्या एच.पी.टी. महाविद्यालयातील वृत्तविद्या विभागात दोन वर्षे.


साहित्यलेखः *कादंबर्‍या (2)

1) श्राध्द - (तीन आवृत्त्या) (पहिली आवृत्ती मार्च 1986)
2) अस्वस्थ नायक - (पहिली आवृत्ती जानेवारी 2000)
*कथासंग्रह (5)
1. रंग माणसांचे - (दोन आवृत्त्या) (प्रथम आवृत्ती 1995)
2. कथा माणसांच्या - (पहिली आवृत्ती एप्रिल 2001)
3. कावळे आणि माणसं - (पहिली आवृत्ती 1998)(दोन आवृत्त्या)
4. न दिसणारी लढाई ( पहिली आवृत्ती मे 2008)
5. परत्या (मे 2010)
*ललित (3)
1. थोडंसं वेगळं - (पहिली आवृत्ती 30 जून 2002)
2. कुंभमेळ्यात भैरू - (2003)
3. निवडणुकीत भैरू - (जुलै 2004)
*संशोधनपर ग्रंथ (5)
1. देवदासी आणि नग्नपूजा - (सात आवृत्त्या) (प्रथम आवृत्ती - जुलै 1988)
2. भटक्यांचे लग्न - (पाच आवृत्त्या) (प्रथम आवृत्ती - फेब्रु. १९८८)
3. कुंभमेळा साधूंचा की संधीसाधूंचा?(दोन आवृत्त्या) (प्रथम आवृती- ऑक्टो1991)
4. अनिष्ट प्रथा - (तीन आवृत्त्या) (प्रथम आवृत्ती - मार्च 1991)
5. वामनदादांच्या गीतातील भीमदर्शन.(सप्टेंबर 2004)

*काव्य (2)1.जागतिकीकरणात माझी कविता - (जानेवारी - 2006)
2. नाशिक तू एक सुंदर कविता - (मे - 2008)

* संपादने (7)1. गजाआडच्या कविता (पहिली आवृत्ती फेब्रुवारी 2002)(कन्नड आवृत्ती प्रसिध्द)
2. झोत ः सामाजिक न्यायावर (फेब्रुवारी 2006)
3. प्रथा अशी न्यारी (दोन आवृत्त्या) (प्रथम आवृत्ती - मार्च 1991)
4. रावसाहेब कसबे यांचे क्रांतीकारी चिंतन (ऑगस्ट 2006)
5. शेतकर्‍यांच्या आत्महत्या ः एक शोध (संशोधन) (एप्रिल - 2006)
6. जागतिकीकरणातील मराठी कविता (मे - 2009)
7. जागतिकीकरणाची अरिष्टे (फेब्रुवारी - 2010)
* अग्रलेखांचे संपादन (1)1) डोंगरासाठी काही फुले (जानेवारी - 2008)
* मुलाखती संपादन (1)
1) लढणार्‍यांच्या मुलाखती (जानेवारी - 2008)
* आत्मकथने (3)1. वाट तुडवतांना ः (मे 2003) - पाच आवृत्त्या
2. आई समजून घेताना ( ऑगस्ट 2006) - नऊ आवृत्त्या
3. एका स्वागताध्यक्षाची डायरी ( एप्रिल - 2008)
* पुस्तिका (10)
1. नव्या शतकात संतसाहित्य टिकेल काय? (दोन आवृत्त्या) (पहिली आवृत्ती 1998)
2. राजर्षी शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण (जुलै 2004)
3. राजर्षी शाहू महाराज आणि महिला मुक्ती (जुलै 2003)
4. महात्मा फुल्यांची जलनीती दोन आवृत्त्या) (2005)
5. जागतिकीकरण आणि दलितांचे प्रश्न (सप्टेंबर 2002)
6. आंबेडकरी संमेलनातील अध्यक्षीय भाषण (जानेवारी 2006)
7. कामगार साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण (जानेवारी 2006)
8. आंबेडकरी साहित्य (अमरावतीमधील भाषण) (जानेवारी - 2008)
9. स्वागतास उभा मी-सांगली अ.भा.साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून केलेले भाषण (2008)
10. ओबीसींचे राजकारण (जुलै 2008) (चार आवृत्त्या)
* गुजरातमधील इयत्ता अकरावीच्या मराठी मुलांच्या पाठय़पुस्तकासाठी लेखन.
* गुलबर्गा विद्यापीठात आई समजून घेताना एम.ए.च्या अभ्यासकऎमासाठी
* कर्नाटकात `वाट तुडवताना' या आत्मचरित्रावर एम.फिल. पूर्ण
* कर्नाटक विद्यापीठात `वाट तुडवताना' एम.ए.च्या अभ्यासकऎमासाठी
* शिवाजी विद्यापीठात एका विद्या ्थ्याकडून एम.फिल. पूर्ण
* विजापूर महिला विद्यापीठात `आई समजून घेताना' बी.ए.च्या अभ्यासकऎमासाठी
* `पोरासाठी चार शब्द` या कवितेचे शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्याकडून
विधान परिषदेत वाचन (6-4-2010)
* `आई समजून घेताना' पुस्तकाचे अंधासाठी Talking Book ब्रेललिपीत रूपांतर,
* `आई समजून घेताना' पुस्तकाचे कन्नड व इंग्रजीतही अनुवाद प्रसिद्ध.
* `वाट तुडवतांना` या ग्रंथाचा हिंदी अनुवाद प्रसिद्ध.
* `वाट तुडवतांना` उ.महाराष्ट्र, नांदेड आणि मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी.
* `जागतिकीकरणातील मराठी कविता` अमरावती विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी
* `देवदासी आणि नग्नपूजा` या पुस्तकाचा हिंदी अनुवाद.
* चार विद्यार्थ्यांकडून पी.एचडी साठी संशोधन सुरू.
* काही कविता व कथांचा हिंदी, कन्नड, इंग्रजी व मल्याळी भाषेत अनुवाद.
* `जलसाक्षरता' प्रकल्पाची `सकाळ'च्या माध्यमातून अंमलबजावणी.
* भटके, देवदासी आदी उपेक्षितांच्या चळवळीत सहभाग.
* महाराष्टखातील एक प्रभावी वक्ता.
* अध्यक्ष.1) प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन, बुलढाणा
2) बंधुता साहित्य संमेलन, नाशिक (22 फेब्रुवारी.2004)
3) शब्दगंध साहित्य संमेलन, सांगली
4) नववे अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन, वणी (यवतमाळ) (13जाने.2006)
5) तेरावे कामगार साहित्य संमेलन, अमरावती (20,21 जाने.2006)
6) दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळ्ळूर, कर्नाटक ( 4 फेब्रुवारी 2007)
7) अध्यक्ष - सहावे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन, दादर (5 सप्टे.2009)
8) 81वे अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष-सांगली(18 ते 20 जाने.08)
9) उद्घाटक - नववे बंधुता साहित्य संमेलन, (23 फेब्रुवारी2008)
10) उद्घाटक - जागतिक आयुर्वेद परिषद, थायलँड (23 ऑगस्ट 2008)
11) उद्घाटक - 40 वे अंकुर साहित्य संमेलन, चाळीसगाव (4 नोव्हें.2008)
12) उद्घाटक - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, नगर (21 मे.2010)
सहभागः 
1) अखिल भारतीय साहित य संमेलन,आळंदी (1 ते 4 फेब्रुवारी1996)
2) अखिल भारतीय साहित्य संमेलन, इंदूर (19 फेब्रुवारी2001)

पत्रकारितेसाठी त्यांना एकूण - 53 पुरस्कार मिळाले
1. उत्तम लेखनासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार.
2. सामाजिक प्रश्नावरील लेखनासाठी `डॉ. ना. भि. परूळेकर' पुरस्कार.
3. पत्रकारितेसाठी `दर्पण' पुरस्कार. (जानेवारी - 1993)
4. अंधश्रध्दा निर्मूलन व धर्म चिकित्सेसाठी `आगरकर' पुरस्कार. (सप्टेंबर 1995)
5. सिन्नर तालुका पत्रकार संघातर्फे `प्रकाशशेठ शहा' पुरस्कार.
6. `दीन बंधू' पत्रकारिता पुरस्कार. (फेब्रुवारी 2004)
7. महाड येथील `जनार्दन मवाडे स्मृती' पुरस्कार. (मार्च - 2004)
8. भालेराव प्रतिष्ठान, जळगावतर्फे `दलित अस्मिता पुरस्कार' (फेब्रुवारी 2005)
9. महात्मा फुले समता परिषदेतर्फे `समता पुरस्कार'. (नोव्हेंबर 2005)
10. भवतु सब्ब मंगलम संस्था, मुंबईतर्फे `डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुरस्कार.
11. रत्नागिरी येथील महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे `संपादक भूषण' पुरस्कार.
12. दया पवार प्रतिष्ठानतर्फे `दया पवार' साहित्य पुरस्कार.
13. पुण्यातील लोकजागर पुरस्कार (जाने.2008)
14. जगसिंगपूरमधील चंद्रभागातिरी पुरस्कार ( जानेवारी - 2008)
15. सांगलीतील प्रतिष्ठा प्रतिष्ठानचा पुरस्कार
16. पत्रकारितेसाठी सह्याद्री वाहिनीचा `नवरत्न पुरस्कार' (एप्रिल 2008)
17. पत्रकारिता व साहित्यासाठी प्रबोधनमित्र पुरस्कार, नाशिक (मे.2009)
18. इंदिरा गांधी पुरस्कार (मे 2009)
19. महाराष्ट्र गौरव पुरस्कार - आयआयटीतर्फे, मुंबई (ऑगस्ट 2009)
20 दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार - नगर (डिसें.2009)
21. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकपत्रकारिता पुरस्कार, नागपूर (डिसेंबर - 2009)
22. आशादीप पुरस्कार, पनवेल (मार्च 2010)
23. पुणे रोटरी क्लबचा व्होकेशनल पुरस्कार (मार्च 2010)
(साहित्यनिर्मितीसाठी - 30)
1. `अनिष्ट प्रथा' ग्रंथासाठी राज्य शासनाचा पुरस्कार. (मार्च - 1993)
2. `कुंभमेळा साधूंचा की संधीसाधूं'चा साठी म.सा.प.चा केशवराव विचारे पुरस्कार (मे. 1993)
3. `श्राध्द' कादंबरीसाठी राज्य शासनाचा पुरस्कार.
4. `प्रथ ा अशी न्यारी' ग्रंथासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार.
5. `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी मुक्त विद्यापीठाचा `बाबूराव बागूल' पुरस्कार.(ऑक्टो.1997)
6. `रंग माणसांचे' कथासंगऎहासाठी `ग.दि.माडगूळकर' पुरस्कार.(ऑगस्ट 97)
7. लेखनाव्दारे प्रबोधन केल्याबद्दल `बंधुता' पुरस्कार.(जून 97)
8. `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `वा.ना.पंडित' पुरस्कार.
9. `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `कुसुमाग्रज' पुरस्कार.
10. सांगाती साहित्य अकादमीचा साहित्य पुरस्कार, बेळगाव (मे.1999)
11. रंग माणसांचे कथासंग्रहासाठी `संत ज्ञानेश्वर' पुरस्कार. (ऑगस्ट 2001)
12. परिवर्तनवादी साहित्य प्रबोधिनीतर्फे `परिवर्तनवादी कवी' पुरस्कार.
13. `अस्वस्थ नायक` कादंबरीसाठी युगांतर प्रतिष्ठानचा `बंधुमाधव' पुरस्कार. (जाने.2001)
14. `देवदासी आणि नग्नपूजा` पुस्तकासाठी लोकायत विचार मंचचा `लोकायत' पुरस्कार.(मे 2001)
15. गजाआडच्या कविता या कैद्यांच्या संपादीत काव्यसंग्रहासाठी माचीगड (बेळगाव) येथील सुब्रह्मण्यम साहित्य अकादमीचा `श्री गणेश स्मृती' पुरस्कार. (जानेवारी - 2003) पुरस्कार
16. `वाट तुडवताना' या आत्मचरित्राला `अस्मितादर्श' वाड्मय पुरस्कार. (फेब्रुवारी2004)
17. `वाट तुडवताना' या आत्मचरित्रासाठी राज्य शासनाचा वाडःमयनिर्मिती पुरस्कार.(डिसे.2005)
18. `वाट तुडवताना' साठी शिवगिरीजा प्रतिष्ठाणचा कदम गुरूजी पुरस्कार, कुर्डूवाडी (डिसें.2004)
19. `आई समजून घेताना' साठी स्वामीकार पुरस्कार, पुणे (एप्रिल 2008)
20. 'नाशिक तू एक सुंदर कविता' या खंडकाव्यासाठी शालिनी बनहट्टी पुरस्कार (मे.2009)
21. `आई समजून घेताना` साठी माने गुरूजी साहित्य पुरस्कार (डिसें.2006)
22. `जागतिकीकरणात माझी कविता' या काव्यसंग्रहासाठी यशवंत मनोहर पुरस्कार (जून 2007)
23 `जागतिकीकरणात माझी कवितासाठी य. चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार (फेब्रु.2008)
24. क्रांतिअग्रणी पुरस्कार, क ुंडल (डिसें.2007)
25 `आई समजून घेताना' साठी वाड्मयसेवा प्रकाशन पुरस्कार, नाशिक (मार्च 2009)
26. अक्षरगंध साहित्य पुरस्कार, प्रणव प्रतिष्ठाण, श्रीपूर, सोलापूर (डिसे.2007)
27. इस्लामपूर येथील जागर साहित्य पुरस्कार (फेब्रु.2008)
28. आचार्य अत्रे पुरस्कार - बेळगाव (ऑगस्ट - 2008)
29. `लढणार्‍यांच्या मुलाखतीसाठी राज्य शासनाचा डॉ.व्ही.बी.कोलते पुरस्कार (डिसें.2008)
30. कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, बोरीभडक, दौंड (मे 2010)

अभिजित घोरपडे

अभिजीत घोरपडे हा निसर्गाविषयी अभिरूची असलेला एक तरूण पत्रकार, निसर्गतज्ञ, व हवामानाचे अचूक मोजमापन व त्यांसंबंधीचे शास्त्रीय विश्लेषण लोकसत्ता वृत्तपत्राद्वारे वाचकांपर्यंत सोप्या शैलीत पोहोचविणारा लेखक आहे. जीवनात आतापर्यंत कितीतरी बहुआयामी कामे त्याने केलेली आहेत. काही त्याच्यामधील आभ्यासु विद्यार्थ्याला वाव देणारी, काही त्याच्यामधील प्रतिभावंत कलाकाराला न्याय देणारी तर काही त्यांच्या मधील चळवळ्या समाजसेवकाला अधिक परिपुर्ण बनविणारी. अभिजीत घोरपडे हा अतिशय दक्ष व सतत डोळ्यात तेल घालून सामाजिक अस्मितेचे रक्षण करणारा धडाडीचा पत्रकार असण्याबरोबरच तो त्याला शाहारून टाकणार्‍या सूंदर पक्ष्यांचा, प्राण्यांचा व नद्यांचा सच्चा मित्रदेखील आहे. जागतिकीकरणाबरोबर गहिर्‍या व गुंतागुंतीच्या होत चाललेल्या खंडीभर पर्यावरणीय समस्यांना त्याने त्याच्या लेखनातून नेहमीच तोंड फोडले आहे. मानवाने उच्च तंत्रज्ञानाच्या जोरावर ज्या पशुप्क्ष्यांचा आवाज दाबून ठेवला होता त्यांना अभिजीत याने विवीध कार्यक्रमांमधून व पुस्तकांमधून बोलतं केलं आहे. त्याचे फोटो काढण्यामधील कौशल्य पाहिले तरी त्यांच्यातील बहुपैलुत्व धारण केलेल्या कलाकाराची खोली कळते. सामाजिक बांधीलकी वर अपार श्रध्दा ठेविणार्‍या अभिजीत याने पर्यावरणीय शोषणाविरूध्द जनतेचा बुलंद आवाज निर्माण करण्याचा पणच केलाय. अभिजीत याचा जन्म डिसेंबर 5, , रोजी सातार्‍यात झाला. मॉडर्न हाय स्कुल पुणे येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर 1989 साली पुणे विद्यापीठ येथे त्याने पदवी शिक्षण घेतले. आशावादी स्वभाव, निसर्गप्रेमी मन, व रसिकमय झालेली वृत्ती या व्यक्तित्वगुणांमुळे तो अनेक भटकंती शिबीरांमध्ये व गिर्यारोहक सहलींमध्ये हिरीरीने सहभागी झाला होता. पत्रकारितेत घुसल्यानंतर प्रथम त्याने लोकसत्ता मध्ये हवामानाचा अंदाज देणार्‍या कप्प्यामध्ये आपली जागा पक्की केली. छत्रपती शिवाजी महाराज, अजय अतुल यांच्या विचारांनी व कर्तुत्वानी प्रेरित झालेल्या अभिजीतने त्याच्या कारकिर्दीमध्ये उजनी तलाव, रोहिडा गड उर्फ विचीत्रगड अशा पर्यावरणप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी मानल्या जाणार्‍या अनेक ठिकाणांना भेटी देवून तिथल्या ढासळत चाललेल्या संतुलनावर प्रकाश टाकला. सुंदर फ्लेमिंगो पक्ष्यांच्या मनाला वेड लावणार्‍या लीलादेखील त्याने कॅमेर्‍यात टिपल्या. संथ वाहाते....? या नद्यांच्या सद्यस्थितीचे चित्रण करणारे त्याचे पुस्तकदेखील बरेच गाजले. हे पुस्तक लिहीण्याआधी त्याने संबंधित सर्व नद्यांची स्थानिकांनी पुरविलेल्या तपशीलांवर बारकाईने माहिती मिळवीली होती. नद्यांचे अंतरंग व बाह्यरंग अगदी कलात्मक रितीने व देखण्या फोटोंसहित उलगडयाचा त्याचा हा पहिलाच प्रयत्न भारतभर नावाजला गेला. या पुस्तकांमुळे नदीला पाहून भक्तीने तिच्यासमोर नतमस्तक होणार्‍या भक्तांना आपल्या श्रध्दास्थानांची काय विदारक अवस्था झाली आहे ही इत्यंभुत माहिती मिळाली. नदीमुळे निर्माण झालेल्या संस्कृत्या, तिच्याविषयी असणार्‍या लोकधारणा व श्रध्दाभाव, नद्यांवरील अतिक्रमणे, नदीतून नष्ट होत चाललेली जैवविवीधता, जल प्रदुषण, व वाळुचा बेसुमार उपसा या सद्यपरिस्थीतीवर त्याने बनविलेल्या 'मरणासन्न नद्या' या स्लाईड शोला ेखील अमाप प्रसिध्दी मिळाली. या स्लाईड शो द्वारे, वरवरच्या उपाययोजनांवरती किंवा सरकारवरती विसंबुन राहण्यापेक्षा आपण सर्वांनी मिळुन मुळ मुद्यांनाच हात घातला पाहिजे असे दर्शकांचे विचारमंथन करण्यास तो विसरला नाही. हवामानाचा अंदाज बांधणार्‍या रसदार लेखनाबद्दल त्याला सी. ई. ओ. अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे

विद्याधर गोखले

विद्याधर गोखले

ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे. ४ जानेवारी १९२४ रोजी अमरावती येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे मध्यप्रदेशाच्या काँग्रेस प्रशासनात मंत्री होते. लहानपणी घरातून मिळालेल्या संस्कारांचा विद्याधर गोखले यांच्यावर प्रभाव होता. अमरावती येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९४४ मध्ये ते मुंबईला आले. जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे त्यांनी अध्यापन केले. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जात. यानंतर विद्याधर गोखले यांनी दैनिक लोकसत्तामध्ये बरीच वर्षे पत्रकारिता केली व त्यानंतर पाच वर्ष त्यांनी संपादक म्हणूनही काम पाहिले. पत्रकारिता करीत असताना वृत्तपत्राबरोबरच त्यांची लेखणी नाटयलेखन करू लागली. संगीत नाटकांच्या परंपरेचा वारसा त्यांनी पुढे चालवला. गोखले यांनी एकूण १८ नाटके लिहिली. त्यापैकी काही ऐतिहासिक, पौराणिक तर सामाजिक विषयांवर आधारित आहेत. त्यांची संगीत नाटकं तर लोकप्रिय झालीच पण त्यातील पदांनी आजपर्यंत मराठी मनाला भुरळ घातली आहे. ‘संगीत सुवर्णतुला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’ , ‘जावयाचे बंड’, ‘चमकला ध्रुवाचा तारा’, ‘जयजय गौरीशंकर’ ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण ‘साक्षीदार’, ‘अमृत झाले जहराचे’, ‘मदनाची मंजिरी’, ‘स्वरसम्राज्ञी’ ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं. तर ‘बावनखणी’ हे पेशवे काळावर लिहिलेले संगीत नाटक. ‘गझलसम्राट गालिब’, ‘शायरेआजम’, ‘शायरीचा शालिमार’ ही गालिबचे काव य आणि गालिबचे चरित्र यावरील पुस्तके आहेत. तर फार्सी, उर्दू, हिदी, मराठी आणि संस्कृत कवींच्या कथा सांगणारे ‘कविकथा’ हे त्यांचे पुस्तकही गाजले होते. ‘शंकर सुखकर हो’ हा नाट्यविषयक संदर्भांचा संग्रह नाटकाबद्दल एक वेगळीच ष्टी देऊन जातो. गोखले यांची

लेखणी राजस, रसिकतेची साक्ष देणारी विविधांगी आणि प्रतिभावान अशीच होती. लोकसत्तेतले त्यांचे अग्रलेख हा उत्कृष्ट संपादनाचा, लेखनाचा एकेक नमुना होता. ‘रंगशारदा’ ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली. नाटकात नृत्ये योजण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला. अशा या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचे २६ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.

बाळ ठाकरे

बाळ ठाकरे

(जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, इ.स. २०१२;मुंबई)

मूळचे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार असलेले श्री बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना या राजकीय पक्षाचे संस्थापक . बाळासाहेबांनी १९ जून, १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. श्री बाळासाहेब ठाकरे सामना या मराठी दैनिकाचे मुख्य संपादक होते.

मुंबई-महाराष्ट्रात मराठी माणसाला मान मिळवून देण्याचं काम बाळासाहेबांच्या प्रेरणेशिवाय झालंच नसतं असे त्यांचे विरोधकही खाजगीत मान्य करतात. मुंबईहन पुण्याला ३ तासात पोहोचण्याचं स्वप्नही त्यांचेच... आणि त्यांनीते शिवशाहीच्या काळात प्रत्यक्षात उतरवलेच.

सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाईन या माध्यमातूनही काम करीत असत.

पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना त्यांचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्‍यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक ’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला.

समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर, १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये.

वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व आचार्य अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असतो.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौर्‍यांमुळे १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.

हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते.

झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई असे नामकरण... अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे दु:खद निधन झाले.


ज्योतिबा फुले

ज्योतिबा फुले

जन्म-१८२७

मृत्यू- २८ नोव्हेंबर, १८९०

हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते.

१८२७ - जन्म कटगूण, सातारा जिल्हा
१८३४ ते १८३८ - पंतोजीच्या शाळेत शिक्षण झाले.
१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
१८४७- लहूजी बुवांकडे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
१८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
१८४८ - भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
१८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६ १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात
सत्कार.
१८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.
१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
१८५५ - रात्रशाळेची सुरवात केली.
१८५६ - मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
१८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
१८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
१८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
१८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
१८७५ - शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
१८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
१८७६ ते १८८२ - ुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
१८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
१८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली १८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली. २८ नोव्हेंबर १८९० - पुणे येथे निधन झाले.


प्रकाशित साहित्य
१) तृतीय रत्न नाटक १८५५
२) छत्रपती शिवाजी - राजे भोसले यांचा पवाडा पोवाडा १८६९
३)ब्राह्मणांचे कसब १८६९
४)गुलामगिरी १८७३
५)शेतकर्‍यांचा आसूड १८८३
६)सत्सार १ सत्सार २ १८८५
७)इशारा १८८५
८)सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशित )
९)अखंड काव्य रचना

'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. मूळ गाव - कटगुण (सातारा) गोर्‍हे हे मूळ आडनाव. ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. १८८० - नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुरोहितांकडून होणार्‍या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव कर ून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. 'दीनबंधू' साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरवात केली. मराठीत मंगलाष्टकं रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

सत्यशोधक समाजा’चे संस्थापक, आपल्या पुरोगामी विचारांचे निर्भयपणे आचरण करणारे समाजसुधारक, एकंदरच सुधारणेसंबंधी क्रांतीकारक भूमिका घेणारे आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत म्हणजे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले.
महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी २० फेब्रुवारी १८२७ झाली झाला. त्यांच मूळ आडनाव गोर्हे. वडिलांचा फुलं विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या बंडखोर विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतिबा आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शत्त*ी आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याच ा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक दर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता

विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतीकारक म्हणून ही ज्योतिबांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे ज्योतीराव एक तत्वचितक व्यत्ति*मत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

अशा समाजसुधारकाचे २८ नोव्हेंबर १८९०ला निधन झाले.

महत्त्वाची सुचना

सुचना : माध्यमांचा अभ्यास करु इच्छिणारे विद्यार्थी, शिक्षक, संशोधक यांना एकाच ठिकाणी माहिती मिळावी, यासाठी या ब्लॉगवर लेखकांनी आपले लेख उपलब्ध करुन दिले आहेत. याशिवाय काही मजकूर, छायाचित्रे संकलीत करण्यात आली आहे. तथापि, ब्लॉगवर वापरलेला मजकूर, छायाचित्रे, रेखाचित्रे किंवा इतर कोणत्याही सामुग्रीमुळे कोणत्याही प्रकारच्या स्वामित्वहक्कास बाधा पोहचत आहे,  असे संबंधितांना वाटत असल्यास त्यासंबंधीचा पुरेसा पुरावा जोडून पाठवावा. खात्री पटल्यानंतर हा मजकूर विनंतीनुसार तत्काळ काढण्यात येईल.

नागरिक पत्रकार

नागरिक पत्रकार - विश्वासार्हतेची एक नवी वाट

“We are at the beginning of a Golden Age of journalism — but it is not journalism as we have known it. Media futurists have predicted that by 2021, citizens will produce 50 per cent of the news peer-to-peer. However, mainstream news media have yet to meaningfully adopt or experiment with these new forms.”
न्यू मिडीया या एका महत्त्वाच्या संकेतस्थळावर ठळकपणे लिहिलेले हे वाक्य एका नव्या पत्रकारितेच्या आश्वासक प्रवासाची नांदीच स्पष्ट करत आहे. नागरिक पत्रकार म्हणजेच सिटीझन जर्नालिस्ट हा सध्याच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञान युगात एक अभिनव आणि बर्‍यापैकी विश्वासार्ह असा जनतेचा थेट सहभाग असणारा पैलू समोर येऊ लागला आहे. 2003 मधे इराक युद्धात अहमद या नागरिकाने युद्धभूमीवरून थेट धाडलेल्या बातम्या जागतिक स्तरावर गाजल्या होत्या. दोन देशांमधे जेंव्हा युद्ध होते तेंव्हा तेंव्हा दोन्ही देशाच्या प्रसारमाध्यमातून येणार्‍या बातम्या या बर्‍याच वेळा एका बाजूला झुकलेल्या आणि त्यामुळे वस्तुस्थितीपासून दूर जाणार्‍या असतात असा आपला आजवरचा अनुभव आहे. या अहमदने मात्र जे घडते आहे तेच सांगितले, जे पाहिले ते कथन केले त्यामुळे जागतिक पातळीवर सुद्धा या युद्धाची सत्यस्थती समजली आणि त्यावरून जागतिक संबंधांचा अभ्यास करता आला. 1988 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीत ही नागरिक पत्रकारितेची चुणूक पहायला मिळाली. निवडणूकामधे काय होणार, कोण निवडून येणार, जनतेला काय हवे आहे. याविषयी प्रस्थापित पत्रकारांच्या अंदाजाबद्दल जनमानसात एक अविश्वासाची भावना निर्माण झाली होती. आणि या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनातले वास्तव या नव्या पत्रकारितेमधून पुढे आले.
१९०४ मधे रादरगेट या नावाने प्रसिद्ध असलेली ब्लॉगर्सच्या यशस्वी पत्रकारितेची गाजलेली घटना इथे सांगावीशी वाटते. डॅन रादर हा सीबीएस या प्रसिद्ध अमेरिकन टेलिव्हिजन चॅनलचा नावाजलेला पत्रकार आपल्या सिक्स्टी मिनिट या कार्यक्रमात तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या राष्टीय संरक्षण सेवेसंबंधी काही कागदपत्रे त्यांनी वाहिनीवर दाखविली. ती विश्वासार्ह नाहीत असा दावा काही ब्लॉगर्स नागरिकांनी पुराव्यासहित केला. अर्थातच वाहिनीला माफी मागावी लागली आणि डॅन रादर यांनी आपली सेवा निवृत्ती त्याचा विहित कालावधी संपण्याच्या एक वर्ष आधीच 2005 मधे जाहिर केली. एका नावाजलेल्या पत्रकाराची माहिती खोटी ठरवणे आणि पुराव्यानिशी ती सिद्ध करणे हा नागरिक पत्रकारितेचा सर्वोत्तम नमुना मानायला हवा. गेल्या 10-12 वर्षात ही पत्रकारिता इंटरनेटच्या प्रसारामुळे सर्वसमावेशक आणि सुनियंत्रित स्वरूपात पुढे येऊ लागली आहे. वेब2.0 या नावाने प्रसिद्ध असलेली संगणक प्रणाली 2004 मधे विकसित झाली. माहितीचे आदानप्रदान त्यामुळे सुकर झाले. लोकांचा सहभाग मोठया प्रमाणात होऊ लागला. ब्लॉग,चर्चास्थळं, ब्रॉडकास्टींग यांच्या माध्यमातून घटना सर्वदूरपर्यंत पोहोचवता येऊ लागल्या. यातून या पत्रकारितेची कक्षा विस्तारली.
आपल्याला असा प्रश्न पडेल की सर्वसाधारण नागरिक म्हणून या पत्रकारितेचे नेमके महत्त्व काय आहे? यांनी खरंच समाजामधे येणारी माहिती अधिक प्रगल्भ, नि:पक्षपातीपणे येत आहे का? एकूणच बातम्यांचा स्तर सुधारला आहे का? तर याचे उत्तर बऱ्याच अंशी होकारार्थी येईल. सिटिझन पत्रकारिता हा जनतेच्या सहभागातून पुढे आलेला प्रवाह असल्यामुळे त्याला एक अंगभूतच विश्वासार्हता प्राप्त झालेली आपल्याला दिसेल.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांची हत्त्या चित्रित करणारा एक सर्वसाधारण नागरिक हा आद्य नागरिक पत्रकार मानला जातो.
दिल्ली मधे नुकत्याच झालेल्या जंतरमंतर इथल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे ते एका रात्रीत देशाचे महानायक बनले. यामधे राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिन्यांचा वाटा मोठा आहेच पण इंटरनेट माध्यमातून भारतभर तरूणाईमधे यामुळे निर्माण झालेली चैतन्यमय सळसळ यांनी या चळवळीला फार मोठी ताकद दिली. एक जनाधार दिला. फेसबूक आणि ट्विटर या माध्यमातून लाखो लोकांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. माहितीची देवाणघेवाण करणं आणि त्यावरून मतं बनवणं हे पारंपरिक पत्रकारितेचे काम आता हा सिटीझन जर्नालिस्ट प्रभावीपणे करू लागला आहे. भल्याभल्या राजकीय नेत्यांना जे जमले नाही ते या नगर जिल्ह्यातल्या सामान्य निवृत्त लष्करी सैनिकाने ८ दिवसात करून दाखवले. अण्णा हजारे हा न्याय आणि भ्रष्टाचार विरोधात लढणारा एक ब्रँड झाला याचे श्रेय नि:संशयपणे त्यांच्या चारित्र्यसंपन्न इतिहासाला आहेच तसेच ते त्यांच्याबाबत जनमानसात निर्माण होणार्‍या वाढत्या प्रतिसादालाही आहे.
सिटीझन जर्नालिस्ट हा नि:संशयपणे समाजातील सक्रिय लोकांमुळे पुढे आलेला एक प्रागतिक विचार आहे. समाजाच्या विकासाचा जास्तीतजास्त चांगला विचार समाजच करु शकतो. गेल्या १० वर्षांत २४ तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिनींच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे बातम्या आणणार्‍या बातमीदारांची उपलब्धता आणि प्रत्यक्ष गरज यामधे मोठी तफावत पडू लागली. यातूनच बातम्या संकलनामधे समाजाच्या थेट सहभागाची संकल्पना आकार घेऊ लागली. सर्वच महत्त्वाच्या वृत्तवाहिन्यांकडे अशा निवडक पत्रकारांची आता फौज निर्माण झाली आहे.
बातमी म्हटलं की राजकीय,सामाजिक, क्रीडा विषयक, अर्थकारण, वैद्यकीय या परिक्षेत्राचा विचार प्राधान्यानं होत असे पण आता बातमी ही अत्यंत बहुआयामी, समाजातील सर्व स्तरांचा विचार करणारी आणि मुख्यत्वे लोकांच्या भावविश्वाशी अधिक तादात्म्य पावणारी या स्वरूपात पुढे येताना दिसते. खऱ्या अर्थानं आता बातमीचे वस्तूकरण झाल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे.
अर्थात त्यामुळे ही आपली बातमी नावाची वस्तू आकर्षक, विश्वसनीय आणि इतरांपेक्षा हटके असावी असे सर्वच प्रसारमाध्यमांना वाटू लागले. यातून समाजाच्या सर्वांगापर्यत जाण्याची या वृत्तसंकलन करणार्‍या संस्थांना निकड भासू लागली आणि यातूनच ही पत्रकारिता सर्वमान्य होऊ लागली. अर्थात या पत्रकारितेबद्दल काही आक्षेपही आहेत. ज्यांना पत्रकारितेचं प्राथमिक शिक्षण नाही त्यांनी या क्षेत्रात अशा प्रकारे काम करणे हे काहींना मान्य नाही. पण यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यामुळेच एरवी माध्यमांना कळणारही नाहीत अशा घटना बातम्या होऊन पुढे येऊ लागल्या आहेत. अमेरिकच्या ट्विन टॉवरवर झालेला दहशतवादी हल्ला, २६.११ ला मुंबईवर अतिरेक्यांनी घातलेली झडप या सारख्या अनेक महत्त्वपूर्ण घटनेत सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या ब्लॉग्ज वरून प्रसारित केलेली माहिती तपासकार्यामधे उपयोगी पडल्याचे सिद्ध झाले आहे.
आपण एक लक्षात घेतले पाहिजे की जेंव्हा कोणतीही घटना घडते तेंव्हा तिथे पत्रकार उपस्थित असेलच असे नाही. किंबहुना बऱ्याच प्रसंगी तो नसतोच. या घटनेला साक्षीदार असतो तिथे त्यावेळी हजर असलेला सर्वसाधारण माणूस, नागरिक. त्यात कोणी विद्यार्थी असतो, चाकरमानी असतो, फेरीवाला असतो कुणी गृहिणी असते तर कुणी व्यापारी. यातूनच पुढे येतो नागरिक पत्रकार ज्यांच्याकडे असते घटनेची इत्यंभूत माहिती, त्याला हे पत्रकारितेच्या शास्त्रानुसार कसे सांगायचे हे माहिती नसते हे मान्य करूनही सत्यता हा बातमीचा महत्त्वाचा निकष मानला तर माध्यमांतून आँखो देखा बातमी मिळते हे निश्चित.
त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ओसामा बिन लादेन याला मारण्यासाठी अमेरिकन हेलिकॉप्टर्स जेंव्हा घिरटया घालत होती ती बातमी. एका संगणक अभियंत्याने ती घरघर ऐकली आणि ती माहिती ट्विटर वर टाकली. त्यावेळी त्याच्या संपर्कात केवळ ७५० व्यक्ती होत्या पण या बातमीने त्याच्या संकेत स्थळावर झुंबड उडाली. त्याची संख्या झाली ८६ हजार. आंतरराष्ट्रीय महत्त्वाची बातमी सर्वप्रथम जाहिर करण्याचे ६श्रेय अशाप्रकारे एका नागरिक पत्रकाराला मिळाले. इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांना राजीनामा देण्यास भाग पाडून पदच्यूत करण्यात नागरिक पत्रकारानी केलेल्या चळवळीचा वाटा मोठा आहे.
एक जागतिक चळवळ म्हणून याकडे आता पाहिले जात आहे त्याचा आवाकाही आता मोठा होत आहे. ऑल व्हॉइसेस सारख्या संस्थेकडे आज जगभरातून 5 लाख नागरिक पत्रकार आपल्या भागातल्या घटना नियमितपणे या संकेतस्थळावर नोंदवत आहेत.
नागरिक पत्रकारितेची काय वैशिष्टये आहेत याचा नीट विचार केला तर या सगळया सोपस्कारातून आपल्याला अनेक भौत्रिक गोष्टींची माहिती मिळते, नव्या संकल्पना पुढे येतात. वेगवेगळी माणसं समजतात, अनेक प्रकल्प साकार होतात. आपल्याला रूची असणाऱ्या मानवी व्यवहारातील काही अद्भूत, कधी मनाला चटका लावणार्‍या तर कधी स्फूर्ती देणाऱ्या सत्य घटना आपल्या पर्यावरणाचा भाग बनतात. आणि हे सगळं होण्याचं कारण म्हणजे ही माहिती देणारा कुणी पगारी पत्रकार नसतो, केवळ कर्तव्यबुद्धी आणि व्यवसायाचा भाग यात नसतो. असते एक सूप्त इच्छा सांगण्याची व्यक्त होण्याची. इंटरनेटच्या मायाजालात अनेक ब्लॉग्ज आणि सार्वजनिक संकेतस्थळं ही माणसाच्या याच व्यक्त होण्याच्या अतिव इच्छेतून जन्माला आलेली आहेत. फेसबूक हे संकेतस्थळ तर जगातल्या माणूस नावाच्या समस्त समाजाचं व्यक्त होण्याच्या आणि नातेसंबंध फुलवण्याच्या उर्मीचं आणि ऊर्जेचं एक प्रतीक बनून राहिले आहे. माध्यमजगात होणार्‍या वेगवान बदलाचा हा पत्रकारितेचा नवा फंडा हा एक सकारात्मक अविष्कार आहे.
अर्थात ही पत्रकारिता सोपी नाही, जाताजाता करण्यासारखी गोष्ट नाही याचं भान आपण ठेवायला हवं. त्यासाठी बातमी कशाला म्हणायची याची प्राथमिक जाण आपल्याला हवी. कारण आपण पाठवत असलेल्या घटनेचा तपशील हा सर्वसाधारण वाचकांना, श्रोत्यांना, प्रेक्षकांना भावणारा हवा. तुमचे वैयक्तिक अनुभव सार्वत्रिकतेची डूब घेऊन पुढे यायला हवेत. सार्वजनिक जीवनात वावरताना तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या, सरकार, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून तुम्हाला येणारे अनुभव प्रभावीपणे आणि थोडक्यात मांडण्याची हातोटी तुमच्याकडे हवी. आपल्या आजूबाजूला डोळसपणे पाहाण्याची आणि संवेदनशील मनाने या घटना टिपण्याची एक नजर तुमच्यात विकसित झाली तर तुम्ही एक आदर्श नागरिक पत्रकार होऊ शकता.

दोन महिन्यांपूर्वी पावसाळ्यात इंदोर जवळील व एका पर्यटनस्थळी वाहुन गेलेल्या माणसांची दृश्ये ही अन्य एका पर्यटकानं मोबाईलमध्ये चित्रित करून चॅनलला दिली अन् सर्वांना पहाता आली. असंख्य अपघातांची तिथे हजर असलेल्या सामान्य नागरिकांनी चित्रित केलेली दृश्ये चॅनलला खूप उपयुक्त ठरतात.
२००५ मधे आपल्या देशात माहितीचा अधिकार हा हक्क सर्वसामान्य नागरिकांना प्रदान करण्यात आला. त्यामुळे सजग नागरी मंच, सिव्हिल सोसायटी या संकल्पना मूळ धरू लागल्या. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने गोपनीय अशी माहिती सोडून बाकीची सर्व माहिती मागणी केल्यास नागरिकांना उपलब्ध करून देणे कायद्याने अनिवार्य झाले. संपूर्ण राज्यकारभारात, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात एक पारदर्शकता निर्माण झाली. या साऱ्या घडामोडींमुळे नागरी पत्रकारितेच्या विकासाला चांगला हातभार लागला.
आपल्या देशात या वर्षाच्या सुरवातीला गाजलेला कॉमनवेल्थ खेळातील भ्रष्टाचार आणि मुंबईच्या आदर्श सोसायटीतील अनियमितता ही वृत्तवाहिन्यांनी चव्हाटयावर आणली त्यात त्यांच्या शोधपत्रकारितेचा मोठा वाटा आहेच पण सर्वसामान्य नागरिकांकडूनही त्यांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. सजग नागरिक हा एक चांगला पत्रकार होऊ शकतो हेच या प्रसंगाने सिद्ध झाले.

सिटीझन जर्नालिस्ट ही आता मान्यताप्राप्त संकल्पना झाली आहे. अमेरिकेतील महत्त्वाच्या राजकीय परिषदांना आता या मंडळीना अधिकृत निमंत्रणे येऊ लागली आहेत. ऑलिंपिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या निमंत्रणांमधे सिटीझन जर्नालिस्ट यांचा होणारा समावेश हे याला मिळत असलेल्या लोकमान्यतेचे उदाहरण म्हणता येईल. अमेरिके सारख्या संपन्न देशात आज नागरिकांच्या बातमी मिळण्याच्या स्त्रोतात बदल झाल्याचे दिसतात. आता वेबसाईट्स वरून, ट्विीटर वरून येणाऱ्या बातम्या जास्त वाचल्या जातात. यात मिळणार्‍या बातम्या या नागरिकांनी परस्परात वितरित केलेल्या अशा स्वरूपाच्या असतात. साहजिकच त्यामुळे नागरीक पत्रकारितेला मिळणारा प्रतिसाद हा वाढत आहे.
विकीपिडीया हे या वाचकांच्या सहभागातून त्यांनी तयार केलेल्या मजकूराच्या, माहितीच्या महाजालामुळे केवढया प्रमाणात विस्तारित झाले आहे ते आपण पहातो आहोतच. विकीन्युज हे त्यांचे संकेतस्थळ हे नागरिक पत्रकारितेलाच वाहिलेले आहे. गुगल हे असंच एक शोध संकेतस्थळ यावर कोणतीही माहिती एका क्लिकसरशी आपल्या पुढयात येते यावरचा बराच मजकूर हा सर्वसामान्य नागरिकांच्या माहिती स्त्रोतातून उपलब्ध झालेला असतो.
अर्थात सोशल साईट्सवर टाकला जाणारा प्रत्येक मजकूर म्हणजे नागरिक पत्रकारिता नव्हे याचे भान ही बाळगणे आवश्यक आहे. म्हणूनच या पत्रकारितेवर काही जण प्रतिकूल अभिप्रायही व्यक्त करताना दिसतात. यातला मुख्य म्हणजे ही पत्रकारिता नाही, एखाद्या ठिकाणी हजर असलात आणि तुमच्याकडे कॅमेरा असला म्हणजे तुम्ही पत्रकार होत नाही. पत्रकारितेचे रितसर शिक्षण न घेता पत्रकार म्हणून मिरवणे याला काही जणांचा विरोध आहे. शिवाय बातमी कशाला म्हणायचं याचं ज्ञान अनेक जणांना नसतं त्यामुळे बऱ्याच वेळा निरर्थक मजकूर, आणि अनावश्यक माहिती पुढे येते. शिवाय ती कशी मांडायची याचे एक शास्त्र आहे. नागरिक पत्रकारांनी ते समजावून घेतल्यास अनेक प्रसार माध्यमं ते प्रसिद्ध करण्यास तयार होतात असा अनुभव आहे. स्थानिक घडामोडी आपल्या विभागातल्या नागरिकांपर्यंत पाहोचवणे आणि सामाईक प्रश्नांवर, समस्यांवर परस्पर विचारविनिमयामधून मार्ग शोधणे यासाठी सिटीझन जर्नालिस्ट हे अत्यंत उपयुक्त असे व्यासपीठ आहे. तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या संपर्क सुविधांमुळे एरवी आत्म केंदि्रत झालेला समाज आता हळूहळू बोलायला लागला आहे. अर्थात जगाच्या बातम्या समजून घेताना आपल्या शेजारच्या सदनिकेत रहाणाऱ्या मुलाचे नाव काय? तो कितवीत आहे हे माहित नसणार्‍यांची संख्याही शहरी भागात लक्षणीय आहे. आपण फक्त माहितीचे भुकेले आहोत. एवढे असून चालणार नाही. आपली संवेदनशीलता, आत्मियता ही जाणीवपूर्वक वाढवायला हवी. कारण आपण शेजाऱ्याचा विचार केला तरच समाजाचा, देशाचा विचार करू शकू. आपण ग्लोबल बनताना आपला लोकल चेहरा पुसला जाणार नाही याची काळजी आता आपल्याला घ्यायला हवी. यातच खऱ्या नागरिक पत्रकाराची मूल्यं दडलेली आहेत. नागरिक पत्रकाराची भूमिका ही 'जागल्याची' असली पाहिजे. आप ्याला मिळालेली माहिती जर जनहितविरोधी असेल अथवा कल्याणकारी असेल तर ती त्यानं चॅनल अथवा वृत्तपत्रांना त्वरित कळवायला हवी. त्या बातमीची सत्यासत्यता, महत्व आणि गांभीर्य ठरविण्याचं काम माध्यमं करतील. त्यासाठी सामान्य नागरिक पत्रकाराने कायदा हातात घेवू नये अथवा त्याचा गैरवापर करू नये ही त्याच्यावरची मोठीच जबाबदारी आहे.

डॉ. केशव साठये
9,सावरी सोसायटी, हॅपी कॉलनी, कोथरूड,
पुणे 411029 मो: 98221 08314

माध्यम इंटरनेट

पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्काशी संबंधित चर्चा किंवा अभ्यासक्रम असला की त्याची सुरूवात हमखास उपलब्ध माध्यमांच्या प्रस्तावनेने होते. छापिल माध्यम अर्थात प्रेस वा प्रिंट मिडीया, मग रेडिओ, त्यानंतर दूरदर्शन, आणि पुढे अगदी चित्रपटापर्यंतच्या विविध माध्यमांचा उल्लेख त्या प्रस्तावनेत अपरिहार्यपणे होतो. वृत्तपत्रांचा जनमानसावरील प्रभाव, दूरदर्शनच्या प्रभावातून उद्भवलेले परिणाम वगैरे विषय अगदी शाळकरी प्रश्नपत्रिकेत सुद्धा निबंध लिहीण्याचे विषय म्हणून डोकावताना दिसतात. बातम्यांची माध्यमं म्हणून वृत्तपत्रे आणि दूरदर्शन पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. 

खरं तर वृत्तपत्र काय किंवा दुरदर्शनची एखादी वाहिनी काय, त्यांच्या प्रसारणाला मूळातच भौगोलिक मर्यादा असते. याच मर्यादेवरचा एक उपाय म्हणून इंटरनेटवर वृत्तपत्रांच्या वेबसाईटस आपल्याला दिसतात. वॉशिंग्टन पोस्ट किंवा न्युयॉर्क टाईम्स सारखं वृत्तपत्र मुंबई, पुणे गोव्यातल्या प्रत्येक इंग्रजी वाचकापर्यंत पोहोचणं जसं शक्य नसतं, तसच भारताचा टाईम्स ऑफ इंडिया किंवा लोकसत्ता वा गोमांतक न्यु जर्सीतल्या प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचणं अशक्य असतं. जगात कुठेही एखादं विशिष्ट वृत्तपत्र हाती पडलं नाही तरी त्या वृत्तपत्राची वेबसाईट त्या वाचकाची वाचनाची भूक भागवू शकते. म्हणजे, खरं तर इंटरनेट भौगोलिक दृष्ट्या वृत्तपत्राच्या एक पाऊल पुढेच असतं. वृत्तपत्राची ती मर्यादा त्याला कधीच अडवत नाही.

जो प्रकार वृत्तपत्रांच्या बाबतीत तोच दुरदर्शनच्या बाबतीतही आहेच. आजकल किंवा स्टार माझा वा मी मराठी सारख्या वाहिन्या जगभर दिसत नसल्या तरी इंटरनेटवरून त्यांचे प्रसारण जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचू शकते. दुरदर्शन वाहिन्यांना भौगोलिक मर्यादेबरोबर काळाची मर्यादाही असते. कालची बातमी पहायची तर एक दिवस अगोदरचा पेपर आपण रद्दीतून काढून पाहू शकतो. मात्र कालची बातमी आज पाहण्याची सोय दूरदर्शनवर नसते. कालची बातमी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केलेली नसेल तर ती उपलब्ध होणं दुरापास्त आणि काही वेळा अशक्यच असतं. इंटरनेटवर ह्या उलट परिस्थिती असते. न्युयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर आज १८५१ सालापासून ते आजतागायत म्हणजे २००८ सालापर्यंत प्रकाशित झालेल्या बातम्या तुम्ही पाहू शकता. थोडक्यात, काळ, वेळ आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण पृथ्वीतल व्यापून राहिलेले आजचे इंटरनेट हे माध्यम, प्रेस आणि टीव्ही सारखे स्वतंत्र माध्यम मानायलाच हवे.

३१ ऑगस्ट १९२० रोजी अमेरिकेत डेट्रॉइट (मिशिगन) येथे जगातले रेडिओवरचे पहिले बातमीपत्र प्रसारित केले गेले. भारतात रेडिओची खरी सुरूवात १९३६ साली झाली. १९२० ते १९३६ हा काळ १६ वर्षांचा आहे. १९३६ ते १९४७ ह्या काळात भारतात केवळ ८ आकाशवाणी केंद्रे सुरू झाली होती. म्हणजेच रेडिओ माध्यमाचा प्रसार आपल्या देशात कुर्मगतीने झाला. इंटरनेट मात्र आज अतिशय सुसाट वेगाने भारतात पसरत आहे, आणि जगात होणारी प्रत्येक तांत्रिक प्रगती आपल्यामध्ये सामावून घेत आहे. १९२० किंवा त्या लगतचा अगदी कालपर्यंतच्या काळात ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना कल्पनेतही आलेली नव्हती. आता ती भारतासह सर्वच राष्ट्रांमध्ये कमीअधिक झपाट्याने रूजते आहे. ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये एका गल्लीतला विकास दुसर्‍या गल्लीत व्हायला पूर्वीसारखा दशका दशकांचा वेळ लागत नाही. इंटरनेट हे भारतामध्ये १९९४-९५ मध्ये शहरी लोकांच्या घरात पोहोचले. पुढल्या दहा वर्षांत ते खेड्यापाड्यातही पोहोचले. आपल्याकडील इंटरनेटचा प्रसार हा वायर आणि तारांच्या तांत्रिकतेमध्ये अडलेला नाही. तो आपल्याकडील शिक्षणाच्या धीम्या गतीमुळे व ग्रामीण भागातील इंग्रजी भाषेच्या आकलनाच्या मर्यादांमुळे धीम्या गतीने होतो आहे.

छापलेले वृत्तपत्र हे कितीही गुळगुळीत आर्टपेपरवर छापलेले असले आणि डोळे दिपवणार्‍या बहुरंगी छायाचित्रांनी नटलेले असले तरी ते मुके असते. दुसरीकडे दुरदर्शन अगदी जिवंत दृश्य पहात आहोत एवढे प्रेक्षणीय असले तरी ती तशा दृश्यांची एक क्रमवारीने येणारी मालिका असते. न्युज अॅट टेन म्हणून बरोबर दहा वाजता सुरू झालेले दुरदर्शनवरचे वार्तापत्र काही मिनिटांनी पुढे गेले की ते मागे आणता येणे शक्य नसते. चुकलेली बातमी पुन्हा पंधरा मिनिटांनी वा अर्ध्या तासांनी जेव्हा पुन्हा दाखवली जाते तेव्हाच त्या दृश्यांचे दर्शन होते. दुरदर्शन संचावर अग्रलेख वाचता येत नाही, आणि घटना प्रत्यक्ष घडताना वृत्तपत्रात पहाता येत नाही. ह्या दोन्ही माध्यमांच्या त्या मर्यादा इंटरनेटच्या वेबसाईटला अडवू शकत नाहीत. वेबसाईटवर अग्रलेखही वाचता येतो आणि तीन मिनिटांपूर्वी दाखवले गेलेले दृश्य माऊसने एकदा क्लीक केलं की काही क्षणात डाऊनलोड होऊन समोर उलगडू लागते. म्हणजेच छापिल वृत्तपत्र आणि दुरदर्शन दोन्हींचे गुण एकत्र करणारे, व दोन्हींमधील दोषांना मागे सारून पुढे जाणारे माध्यम म्हणून इंटरनेट एकूण शर्यतीत पुढे येताना दिसते.

इंटरनेट प्रेस वा टीव्ही माध्यमांच्या दोषांवर उपाय देत पुढे सरसावते म्हणून त्याला कोणी सुपर माध्यम म्हणेल असे मात्र नाही. इंटरनेट उद्याच्या सुपर माध्यमाच्या दिशेने निश्चित वाटचाल करू शकेल असा एक महत्वाचा गुण त्यात आहे, तो गुण म्हणजे त्याची इंटरॅक्टीव्हीटी. वाचकांच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रे वा दुरदर्शनकडे जाण्यासाठी काही काळ जावा लागतो. वाचक कागदावर काहीतरी लिहील, तो कागद पोस्टाने वा फॅक्सने वृत्तपत्राकडे किंवा दुरदर्शनकडे पाठवील. त्यानंतर त्या वाचकाची ती प्रतिक्रिया जगापुढे येईल. वृत्तपत्र अशी किती पत्रे छापू शकेल, किंवा दुरदर्शन अशा किती पत्रांचा उल्लेख करू शकेल याला अनुक्रमे वृत्तपत्रातील जागा व दुरदर्शनवरील वेळेच्या मर्यादा आहेत. इंटरनेटवर बसलेला वाचक मात्र काही क्षणात कोणताही कागद न घेता, पोस्ट वा फॅक्सच्या नादी न लागता चटकन आपली प्रतिक्रिया (Comment) वेबसाईटवर नोंदवू शकेल. अशा असंख्य प्रतिक्रिया आल्या तरी त्यांना तिथे जागा कमी पडणार नाही, आणि कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी कोणालाही कुठेही त्या प्रतिक्रिया वाचता येतील. वाचकांच्या प्रतिक्रियांना काही क्षणात उत्तर देणे हेही लेखकाला अशक्य नाही. वाचक वा दर्शक आणि इंटरनेटचे माध्यम यातली ही थेट संवादाची सोय इंटरनेटला सुपर माध्यमाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.

भाषेच्या मर्यादाही मागे पडत आहेत.. 

इंटरनेट म्हंटलं की इंग्रजी अपरिहार्य आहे, आणि त्यामुळेच भारतासारख्या देशात त्यावर मर्यादा पडतील असं काल-परवापर्यंत वाटत होतं. मात्र हिंदी, मराठी किंवा अगदी बंगाली, तामिळ, तेलुगू सारख्या भाषांचे युनिकोड फाँटस उपलब्ध झाल्याने आज अक्षरशः हजारो वेबसाईटस आणि ब्लॉग्ज भारतीय भाषांतून सहजपणे तयार होताना दिसू लागले आहेत. मध्यंतरी जया बच्चन यांनी 'हम युपीवाले है, हम हिंदी में बोलेंगे' हे उदगार काढले आणि त्यावर गदारोळ उठला. ह्या प्रकरणात स्वतः अमिताभ बच्चनला काय म्हणायचय याबद्दल सर्वांनाच कुतूहल होते. अमिताभला जे म्हणायचे होते, ते अमिताभने भारताबाहेर असताना आपल्या ब्लॉगवर लिहीले. हा ब्लॉग अमिताभचा अधिकृत ब्लॉग असल्याने तो विश्वासार्ह होता. अमिताभ वृत्तपत्रांना वा वाहिन्यांना मुलाखतीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही, तरी ब्लॉगवरील त्याच्या स्वगतावरून सर्व वृत्तपत्रांनी व वाहिन्यांनी सविस्तर बातम्या दिल्या. जगभरात अक्षरशः लाखो लोकांनी तो ब्लॉग वाचला. आपल्या हजारो प्रतिक्रिया त्यावर नोंदवल्या. अमिताभचा हा ब्लॉग इंग्रजीत होता. मात्र ज्यांना चांगले इंग्रजी येत नाही, असे महत्वाचे पुढारी वा तत्सम महत्वाच्या व्यक्तींना आज हिंदी, मराठी वा तत्सम भाषेत आपला ब्लॉग तयार करणे आज शक्य आहे. इंटरनेटने इंग्रजी भाषेचा अडथळा मागे टाकला आहे ही बाब भारतासारख्या बहुभाषी देशाच्या दृष्टीने खरोखरीच क्रांतीकारक आहे.

इंटरनेटच्या बाबतीत डिजिटल डिव्हाईड च्या मुद्याबद्दल नेहमीच चर्चा होते. १९९५ साली भारतात आलेले इंटरनेट २००८ साली दुरदर्शनसारखे घराघरात गेलेले असेल असा दावा किंवा अपेक्षा कोणीच करणार नाही. त्यातही त्यातील भाषेचा वापर हा आजच्या पेक्षाही अधिक सुलभ होण्याची गरज आहे. भारतीय भाषांच्या युनिकोड तंत्राची प्रगती आजही पुढे सरकते आहे. २०१० सालापर्यंत तिला पुर्णत्व येईल अशी आशा बाळगली जात आहे.

सर्वसामान्यांची पत्रकारिता 

वृत्तपत्रांतील वाचकांची पत्रे हा नेहमीच एक महत्वाचा भाग मानला जातो. कित्येकदा जेथे बातमीदार पोहोचत नाही अशा एखाद्या मुद्यापर्यंत एखादा वाचक पोहोचलेला असतो. तो पत्र लिहून ती बाब वृत्तपत्राला कळवतो तेव्हा आश्चर्याचे धक्के बसतात, आणि चक्रे वेगाने फिरतात. अशी उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. आता ह्या वाचकांच्या पत्राच्या पुढे नेणारी सर्वसामान्यांची पत्रकारिता किंवा सिटीझन्स जर्नालिझम जगभरात बहरताना दिसतो आहे. माध्यमांच्या दृष्टीने म्हंटले तर एकीकडे हे आव्हान आहे, तर दुसरीकडे ते एक वरदानही आहे. ज्या वृत्तपत्राकडे सिटीझन जर्नालिझमची जास्तीत जास्त शक्ती असेल, वा ज्या वाहिनीकडे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांकडून प्रत्यक्ष घेतलेल्या व्हिडिओ क्लीप्स येत असतील अशा वाहिनींची ताकद इतरांपेक्षा अधिक असणार आहे. प्रगत होत चाललेले तंत्रज्ञान एकीकडे सोपे आणि दुसरीकडे किंमतीला अतिशय स्वस्त व परवडण्याजोगे असल्यानेच सिटीझन जर्नालिझमचा प्रवाह दुथडी भरून वाहू लागणार आहे. शे दोनशेला मिळणारा डिजिटल कॅमेरा शेकडो छायाचित्रे घेऊ शकेल व त्यातली अनेक छायाचित्रे इंटरनेटवरून अपलोड होऊन क्षणार्धात वृत्तपत्रे व वाहिन्यांकडे पोहोचू शकतील. हाच प्रकार काही फरकाने व्हिडिओ कॅमेर्‍यांच्या बाबतीतही होणार आहे.

खर्‍या अर्थाने मल्टीमिडिया 

सर्वसामान्यांची पत्रकारिता हे खरं तर उद्याचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून उभं राहण्याची शक्यता आहे. आजचे ब्लॉग्ज हे त्याच दृष्टीने वाटचाल करीत आहेत. वृत्तपत्रे व वाहिन्या देऊ शकणार नाहीत एवढा मजकूर, चित्रे, छायाचित्रे, विचार असा समृद्ध ज्ञानखजिना ब्लॉगचे माध्यम जगापुढे ठेवत जाणार आहे. इंटरनेटच्या पोटात अशा प्रकारची छोटी मोठी माध्यमं नांदत राहणार आहेत. त्यांचा थेट परिणाम आज ज्यांना आपण माध्यमं म्हणतो त्यावर होत जाणार आहे. प्रगत राष्ट्रांतील कित्येक दैनिक वृत्तपत्रांमध्ये आज दररोज वैशिष्ट्यपूर्ण वेबसाईटस व ब्लॉग्जची माहिती वाचकांना दिली जात असते. भाषिक वृत्तपत्रे त्या दृष्टीने आज मागे दिसतात. पण उद्या त्यांना हा भाग ठळकपणे द्यावाच लागणार आहे.

इंटरनेटच्या मर्यादा आणि उद्या 

इंटरनेटचं ताकदवान माध्यम कोणत्याही मर्यादांविना उभं आहे असं चित्र मला इथे रंगवायचं नाही. हे मुद्दे निघाले की हमखास समोरून प्रश्न येतो, की आम्ही बसमध्ये वा रेल्वेगाडीत बसून वृत्तपत्र वाचत जातो. इंटरनेटचं तसं कुठे करता येतं? आरामखुर्चीत बसून इंटरनेटवरचा पेपर कुठे वाचता येतो? किंवा प्रकाशमान संगणकी स्क्रीनवरचं एक पान वाचलं की डोळ्यातून पाणी येऊ लागतं. ह्या इंटरनेटच्या आजच्या काही मर्यादा जरूर आहेत. मोबाईल फोनवर इंटरनेट दिसतं, ते कुठेही पहाता येतं असं मी म्हणणार नाही. कारण त्यात तर प्रचंड मर्यादा आहेत. पण एक लक्षात घ्यायला हवं की गरज ही शोधाची जननी असते. शास्त्रज्ञांचे आजचे प्रयत्न ई इंक आणि ई पेपर च्या दिशेने चालले आहेत. झेरॉक्स, मोटोरोला सारख्या कंपन्या गेली काही वर्षे अब्जावधी रूपये खर्च करून संशोधन करीत आहेत. ई पेपर २०१५ च्या आसपास प्रत्यक्षात येईल अशी चर्चा तज्ज्ञ आणि माहीतगार मंडळी करीत आहेत. ई पेपर असेल आपल्या रोजच्या पेपर सारखाच. संपूर्ण आकाराचा. उदबत्तीचा गोल आकाराचा सुरनळीसारखा बॉक्स असेल तशी सुरनळी ह्या पेपरची होईल. ती तुम्ही जवळ ठेवायची. दर पाच दहा मिनिटांनी त्यातला मजकूर व छायाचित्रे बदलत असतील. तुम्हाला वेळ मिळाला की पेपरची ती सुरनळी सरळ करायची. आलेली ताजी बातमी पहायची. सुरनळी परत ठेवून द्यायची. जे दैनिक हवे त्याची वर्गणी भरलेली असली की त्यावर त्या बातम्या आपोआप उमटत राहणार. ई इंक चे अतिसुक्ष्म कण त्या ई पेपरवर आपोआप इकडे तिकडे होऊन नवनवी अक्षरे, मथळे, छायाचित्रे रिमोट पद्धतीने त्यावर उमटणार. बातमीदार तसच काम करत असणार. अग्रलेख तसेच येत राहतील. लेख तसेच असतील. फक्त पेपर आणि इंक बदलेल.

आज हा सारा प्रकार वाचताना स्वप्नवत आणि अशक्यप्राय वाटतोय. ते स्वाभाविक आहे. पण हे स्वप्न सत्याकडे वाटचाल करत हे देखील वास्तव आहे. ह्या दृष्टीने चाललेले अनेक प्रयोग यशस्वी होत आहेत. विज्ञानाची झेप मानवी मेंदूच्या पलिकडची असते. फॅक्स किंवा दुरदर्शनची कल्पना अठराव्या -एकोणीसाव्या शतकात अशक्यप्रायच वाटली होती. पण विसाव्या शतकात ते वास्तवात आलं. आपण माध्यमांची चर्चा आज करतोय ती आजचे संदर्भ डोक्यात घेऊन. उद्याचे प्रगत संदर्भ डोक्यात घेतले की वाटतं आपला ई पेपर उघडला की पहिल्या पानावर आलेली ताजी बातमी त्यावरची व्हिडिओ क्लीप पहात आपल्याला वाचता येईल. अशा वेळी प्रेस मिडीया विरूद्ध टीव्ही मिडीया अशी विसाव्या शतकात झालेली ऐतिहासिक चर्चा ऐकून हंसू आल्याशिवाय राहणार नाही.


Sunday 8 September 2013

वृत्तसंस्था


              


            



















प्रादेशिक
राष्ट्रीय
आतंरराष्ट्रीय

वर्तमानपत्र लेखन

नियतकालिकांच्या आर्थिक व्यवस्था

नियतकालिकांच्या आर्थिक व्यवस्थेत जमेची फक्त तीन अंग आहेत : वर्गणीदारांकडून येणारे उत्पन्न, किरकोळ अंकांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम आणि जाहिरातदारांकडून येणारे उत्पन्न; परंतु यापेक्षा खर्चाचे तपशील अधिक आहेत. उदा., कागद आणि छपाईचा खर्च, अंकबांधणीचा खर्च, टपालखर्च, लेखकांचा मोबदला, संपादकीय व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन इत्यादी. जमेच्या बाजूला किरकोळ अंकविक्रीपासून मिळणारी रक्कम ही तुलनेने सर्वात गौण आवक आहे. वर्गणी व जाहिराती यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरच नियतकालिकांना खर्चाशी तोंडमिळवणी करावी लागते. जाहिरातींचे उत्पन्न हा या एकूण उत्पन्नाचा फार मोठा घटक आहे; तथापि वर्गणीचे उत्पन्न व जाहिरातीचे उत्पन्न ही परस्परावलंबी आहेत, याचे कारण असे, की जाहिरातदारांच्या दृष्टीने नियतकालिकांचा वाचकवर्ग म्हणजे आपल्या मालासाठी एक बाजारपेठच असते. वाचकवर्ग जितका विस्तृत तितकीच त्यांची बाजारपेठही मोठी. वाढत्या वाचकवर्गाच्या नियतकालिकांना अधिक जाहिराती मिळतात, एवढेच नव्हे, तर त्या अधिक दरानेही मिळण्याची शक्यता असते, म्हणूनच आपल्या खपाचे आकडे नियतकालिके वारंवार प्रसिद्ध करीत असतात. संपन्न देशांतील नियतकालिकांच्या अर्थव्यवस्थेत जाहिरातींचे स्थान व प्रभावही मोठा आहे. त्यांच्या एकूण उत्पन्नाचा किमान निम्मा व अनेकदा ७५ ते ८० टक्के हिस्सा जाहिरातींपासून मिळवलेला असतो. मराठी नियतकालिकांच्या व्यवस्थापनेत गेल्या अर्धशतकापासून मूलगामी फरक होऊ लागला आहे. आरंभी नियतकालिकांचा प्रपंच एकेका व्यक्तीवर, कधी संपादकावर, तर कधी व्यवस्थापकांवर अवलंबून असे. वैयक्तिक कर्तुत्वाचे महत्त्व आता संपुष्टात येत चालले असे नव्हे; पण संपादनकौशल्याला भांडवलाची व व्यवस्थापकीय कौशल्याची जोड ज्या प्रमाणात लाभेल, त्यावर नियतकालिकाची आयुर्मर्यादा अवलंबून असते, ही अनुभवजन्य जाणीव आता रूजली आहे. आपल्या संपादनाखाली निघणाऱ्या नियतकालिकाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य त्या प्रतिष्ठित लेखकांकडून सातत्याने साहित्य मिळविणे नव्या लेखकांच्या शोधात राहून त्यांचे साहित्य मिळविणे, आपल्या उद्दिष्टाला पूरक असे नवे नवे विषय शोधणे, हाती आलेल्या लिखाणाचा यथोचित परामर्ष घेणे ही अनेकांगी संपादकीय जबाबदारी यशस्वी रीतीने पार पाडावयाची असेल, तर संपादकीय सूत्रे एकापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये विभागून संपादकमंडळ स्थापण्याची आवश्यकता भासू लागली आहे. संपादकीय व्यवसायाचे शास्त्रीय शिक्षण मिळण्याची सोयही आता भारतातील काही विद्यापीठांतून झालेली आहे. या अभ्यासक्रमात वृत्तपत्रकारांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले गेले असले, तरी समाजाशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व माध्यमांचा त्यात अंतर्भाव केला असल्यामुळे नियतकालिकांच्या संपादनालासुद्धा हे शिक्षण उपयुक्त ठरू शकते. व्यवस्थापकीय कामकाजाचीही तीच अवस्था आहे. प्रसिद्धीचा वक्तशीरपणा, अंकाची अंतर्बाह्य सजावट, वर्गणीदार व जहिरातदार यांच्या वाढीचे प्रयत्न यांपैकी कशातही कुचराई झाली, तर वाढत्या स्पर्धेच्या जगात निभाव लागणार नाही, हे उमजून सामूहिक व्यवस्थापना अमलात येऊ लागली.
भारतातील समग्र नियतकालिकांची शासनप्रणीत खानेसुमारी १९५७ सालापासून दरवर्षी मिळू लागली आहे. रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स फॉर इंडिया यांच्या द प्रेस इन इंडिया या वर्षिक अहवालात विद्यमान नियतकालिकांची तपशीलवार सूची आणि विविध दृष्टिकोनातून केलेली वर्गीकृत आकडेवारी मिळते. त्यांच्या १९७४ सालच्या अहवालातून भारतीय नियतकालिकसृष्टीच्या रूपरेषा प्रतीत होतात. १९६९-७४ या पाच वर्षांत नियतकालिकांच्या आणि त्यांच्या खपाच्या संख्येत चढउतार आढळत असला, तरी त्यांत अनुक्रमे १७.९% आणि २३.८% वाढ झालेली आहे. एकूण नियतकालिकांत मासिके सर्वाधिक (३९.७%) आणि साप्ताहिके व पाक्षिके त्यांच्या खालोखाल (अनुक्रमे ३२.५ आणि १२.५%) आहेत. हिंदी ही बहुसंख्यकांची भाषा असल्यामुळे हिंदी नियतकालिकांची संख्या आणि खप (अनुक्रमे २,९१८ व ५,६४,९००) अग्रक्रमवार आहेत, हे स्वाभाविकच आहे; पण १९७३ साली या दोन्ही बाबतींत इंग्रजी अग्रेसर होती आणि इतर कोणत्याही प्रांतिक भाषेपेक्षा इंग्रजीत दुपटीहून अधिक संख्येने नियतकालिके प्रसिद्ध होतात आणि त्यापेक्षाही अधिक प्रमाणात खपतात, ही परिस्थिती त्या भाषेच्या भारतातील भवितव्याच्या संदर्भात बोलकी आहे. इतर दृष्टिकोनातून इंग्रजीचे वर्चस्वच आढळून येते. ज्यांच्या प्रत्येक अंकाचा खप १ लक्ष प्रतींपेक्षा अधिक आहे, अशा २५ नियतकालकांमध्ये इंग्रजी नियतकालिके सर्वाधिक (८) आहेत आणि विषयांनुसार केलेल्या वर्गीकरणात २१ विषयांपैकी १४ विषयांत सर्वांत अधिक खप इंग्रजी नियतकालिकांचाच आहे. नियतकालिकप्रकाशनात महाराष्ट्र अखिल भारतात अग्रेसर आहे. महाराष्ट्रात १,६१८ नियतकालिके प्रसिद्ध होतात आणि त्यांचा एकूण खप ४७,९६,००० प्रतींचा आहे.


ज्यांच्या दरेक अंकाच्या १ लक्षाहून अधिक प्रती खपतात अशा सर्वच नियतकालिकांचा हेतू फावल्या वेळात मनोरंजन करणे हा दिसतो. लोकशिक्षण, समाजप्रबोधन हे आपले प्रयोजन मानून त्यासाठी विचारप्रवर्तक, कसदार लेखन प्रसिद्ध करणारी गंभीर प्रकृतीची नियतकालिके कोठल्याही भाषेत तुलनेने अल्पसंख्यच आढळतात; कारण त्यांचा वाचकवर्ग फार मर्यादित असतो. मराठीत प्रसिद्ध होणाऱ्या ६३० नियतकालिकांच्या संदर्भात हीच परिस्थीती आहे, असे समजण्यात काही प्रत्यवाय नसावा. श्रेष्ठ दर्जाच्या मजकुराच्या मागणीचे दडपण वाचकांकडून नसल्यामुळे हिणकस मजकुरांनी भरलेली नियतकालिके निघतात व जगतात. ही परिस्थिती मागणी तसा पुरवठा या न्यायाचे द्योतक आहे हे खरे, पण समाजशिक्षणाचे आणि समाजाच्या सदभिरुचीचे संवर्धन करण्याचे एक प्रभावी माध्यम या दृष्टीने नियतकालिकांचा विचार केला, तर सद्य:स्थिती काहीशी असमाधानकारक आहे, असा अभिप्राय समीक्षणवाड्‌मयातून प्रतीत होतो.

नियतकालिके

नियतकालिके

जे प्रकाशन एकाच शीर्षकाखाली किमान एक आठवड्याच्या किंवा त्याहून अधिक कालावधीने सामान्यत: नियमितपणे प्रसिद्ध होते आणि ज्यात अनेक लेखकांचे विविध विषयांवरचे (किंवा प्रकाशन विशिष्ट विषयाला वाहिलेले असल्यास त्या एकाच विषयावरचे) साहित्य संकलित केलेले असते ते नियतकालिक, अशी सर्वसाधारणपणे नियतकालिकाची व्याख्या करता येईल. दैनिक वृत्तपत्रांचा अंतर्भाव सामान्यत: या संज्ञेत करीत नाहीत. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या विविध घटनांच्या बातम्या ताबडतोब पुरविणे, हा वृत्तपंत्राचा मुख्य हेतू असतो; तेव्हा वृत्तपत्राप्रमाणे बातम्या न पुरविता मनोरंजक वा ज्ञानवर्धक मजकूर जी प्रकाशने नियमित कालावधीने पुरवितात, त्यांनाच नियतकालिक ही संज्ञा आहे. नियतकालिकांचे वर्गीकरण अनेक दृष्टिकोनांतून करता येते. प्रसिद्धीच्या नियतकालानुसार साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक आणि वार्षिक असे नियतकालिकांचे प्रकार होऊ शकतात. मुलांची, स्त्रियांची अशी विशिष्ट वाचकवर्गानुरूप किंवा मनोरंजक, वैचारिक, संशोधनात्मक अशी आशयानुरूप वर्गावारीही करता येते.

नियतकालिक या वाड्‌यप्रकाराचा उदय युरोप खंडात सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. १६६३ साली जर्मनीत हँबर्गला प्रसिद्ध झालेले Erbauliche Monaths-Unterre-dungen हे जगातील पहिले ज्ञात नियतकालिक समजले जाते. पुढील दोनचार वर्षांच्या अवधीतच फ्रान्स, इंग्लंड आणि इटली या देशांत नियतकालिक निघू लागली. या सर्वांची प्रेरणा ज्ञानप्रसार हीच एक होती. यानंतर १० वर्षांनी फ्रान्समध्ये नियतकालिकांतून रंजक स्वरुपाचा मजकूर समाविष्ट होण्यास सुरुवात झाली. १६७२ साली Mercure gallant या नियतकालिकात आख्यायिका, कविता अशा तऱ्हेचे साहित्य संगृहित केले जाऊ लागले. यथाकाल त्याच अनुकरण होऊन यूरोपमधील इतर देशांतही त्याच धर्तीवर नियतकालिके निघू लागली. १६९० साली इंग्लडमध्ये जॉन डंटन हा प्रकाशक अथेनिअन मर्क्युरी हे रंजक नियतकालिक प्रकाशित करु लागला. स्त्रीवर्गातील वाढता शिक्षणप्रसार ध्यानात घेऊन या मासिकाचे काही अंक त्याने खास स्त्रीवाचकांसाठी प्रसिद्ध केले. त्या प्रयोगाला अपेक्षेपेक्षाही अधिक अनुकूल प्रतिसाद मिळाल्यामुळे १६९३ साली त्याने लेडीज मर्क्युरी या नावाचे स्वतंत्र नियतकालिक स्त्रियांसाठी सुरू केले. स्त्रियांसाठी निघणाऱ्या नियतकालिकांचा हा आद्य अवतार समजता येईल.

अठराव्या शतकाच्या आरंभी निबंध या वाड्‌मयप्रकाराचा उदय व विकास होण्यास नियतकालिकाचे माध्यम फार उपयुक्त ठऱले. रिव्ह्यू, टॅटलर, स्पेक्टॅटर इ. नियतकालिकांतून डॅन्येल डीफो, रिचर्ड स्टील व जोसेफ ॲडिसन या तीन निबंधकारांनी इंग्लंडमध्ये लक्षणीय सामाजिक आणि राजकीय जागृती घडवून आणली. त्याबरोबरच आपल्या भाषाशैलीने अभिजात वाङमयाविषयी अभिरुचीही सर्वसामान्य लोकांत निर्माण केली. याच शतकाच्या अखेरच्या दशकात जर्मनीत केवळ वाड्‌मयीन विषयांना वाहिलेली नियतकालिके प्रथम निघाली. शिलर व गटे या विश्वविख्यात साहित्यिकांनी संपादन केलेली वाड्‌मयीन नियतकालिके जर्मन साहित्यात अत्यंत प्रभावी ठरली.

अमेरिकेत नियतकालिकांचा आरंभ १७४१ च्या सुमारास झाला व या अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत तेथे सु. १०० नियतकालिके सुरू झाली. पुढे अमेरिकन नियतकालिकांची जी भरभराट झाली, ती देशातील तत्कालीन सर्वांगीन प्रगतीचा एक भागच समजता येईल. एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापासून मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण अमेरिकेत बहुतेक सर्व घटक राज्यांतून सुरू झाले. त्याचा परिणाम नियतकालकांसाठी एक मोठा वाचकवर्ग निर्माण होण्यात झाला. त्या काळात जी वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रगती झाली तीसुद्धा नियतकालिकांच्या प्रसाराला फार उपयुक्त ठरली. मुद्रणकलेत झालेल्या तांत्रिक सुधारणांमुळे छपाईच्या खर्चात बचत होऊ लागली. कागदाचे उत्पादन मुबलक होऊन तो स्वस्त दराने मिळू लागला. करमणूक आणि ज्ञानवंर्धन या क्षेत्रातील नियतकालिकांची परिणामकारकता जाणून १८७९ सालापासून टपालाच्या दरात त्यांना खास सवलत दिली गेली. या सर्वांचा परिणाम नियतकालिके बहुजनसमाजाला परवडण्याइतकी स्वस्त होण्यात झाला. त्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि त्यांचा प्रसार समाजामधील सर्व थरांपर्यंत पोहोचला.

एकोणिसाव्या शतकात ज्ञानाची अपूर्व प्रगती होऊन त्याच्या नव्या नव्या शाखोपशाखा विकसित झाल्या. विविध विषयांच्या अभ्यासकांनी आणि संशोधकांनी आपापल्या विषयांच्या संवर्धनासाठी विद्वतपरिषदा आणि संघटना स्थापन करून विशिष्ट विषयाला वाहिलेली नियतकालिके प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. नवविचारप्रवर्तक आणि व्यासंगपूर्ण साहित्यासाठी आज जगन्मान्य झालेल्या नेचर, लॅन्सेट, ब्रिटिश मेडिकल जर्नल, जर्नल ऑफ द रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी, इकॉनॉमिक जर्नल या इंग्लंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या आणि पॉप्युलर सायन्स मंथली, सायंटिफिक अमेरिकन, अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू, पॉलिटिकल सायन्स क्कॉर्टर्ली, नॅशनल जिओग्राफिक जर्नल, देदलस या अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांची सुरुवात याच काळातील आहे.

विसाव्या शतकात नियतकालिकांचे काही अभिनव प्रकार अमेरिकेत सुरु झाले. विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण जागतिक घटनांची बातमी समयोचित छायाचित्रांसह पुरविणारे टाइम मॅगझिन हे साप्ताहिक १९२३ साली प्रसिद्ध होऊ लागले आणि वृत्तनियतकालिक या एका नव्या प्रकाराचा नियतकालिकसृष्टित उदय झाला. या साप्ताहिकाला सुरुवातीपासून मिळालेले भरघोस यश पाहून त्याचे अनुकरण होणे स्वाभाविकच होते. अल्पावधीत अमेरिकेत टाइमच्याच धर्तीवर न्यूजवीक, यू. एस. अँड वर्ल्ड रिपोर्ट ही साप्ताहिके निघू लागली. आपले कुशल बातमीदार आणि छायाचित्रकार जगभर नेमून त्यांच्याकरवी मिळालेल्या सामग्रीवर आपल्या खास भाषाशैलीचा संपादकीय संस्कार करून बातम्या गोष्टसदृश स्वरुपात सादर करणे, हे या नियतकालिकांचे वैशिष्ट्ये आहे. फ्रान्समधील L'Express, जर्मनीतील Der spiegel, इटलीतील Panorama व मेक्सिकोतील Tiempo ही या प्रकारातील इतर नावाजलेली नियतकालिके आहेत. वृत्तनियतकालिकांतील टाइमचे अद्वितीयत्व आजतागायत अबाधित आहे. निरनिराळ्या देशांसाठी त्याच्या २०० स्वतंत्र आवृत्त प्रसिद्ध होतात आणि त्यांचा एकूण खप ५५ लक्ष प्रतींचा आहे.

लेखी मजकुरांपेक्षा छायाचित्रांना अधिक प्राधान्य देऊन छायाचित्रांतून घडलेला प्रसंग जणू प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान वाचकांना देणाऱ्या छायाचित्र-नियतकालिकांचा प्रारंभ लाइफ या साप्ताहिकाने १९३६ साली केला. जगातील लक्षवेधक प्रसंगांची कलात्मदृष्ट्या उत्तम आणि अत्यंत परिणामकारक छायाचित्रे प्रसिद्ध करून या साप्ताहिकाने, आर्थिक अडचणींमुळे ते १९७३ साली बंद पडेपर्यंत, नियतकालिकसृष्टीत एक अनन्यसाधारण स्थान मिळविले होते. विद्यमान छायाचित्र प्रसिद्ध करून या साप्ताहिकाने, आर्थिक अडचणींमुळे ते १९७३ साली बंद पडेपर्यंत, नियतकालिकसृष्टित एक अनन्यसाधारण स्थान मिळविले होते. विद्यामान छायाचित्रनियतकालिकांत फान्समधील Paris-Match, जर्मनीतील Stern व इटलीतील Oggi ही श्रेष्ठ दर्जाची समजली जातात. निरनिराळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले विविध विषयांवरील निवडक लेख संक्षिप्त करुन एकत्र छापण्याचा उपक्रम अमेरिकेत लिटररी डायजेस्ट आणि रिव्ह्यू ऑफ रिव्ह्यूज या नियतकालिकांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात सुरू केला होता; पण या कल्पनेची खरी परिपूर्ती १९२२ साली रीडर्स डायजेस्ट नियतकालिकाच्या सुरूवातीने झाली. प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीनुरूप प्रत्येक अंकात भरपूर साहित्य मिळाल्याचे समाधान होईल, अशा योजकतेने संक्षेपासाठी लेख निवडणे हे त्याच्या अभूतपूर्व लोकप्रियतेचे मर्म दिसते. करमणूक, ज्ञान, बहुश्रुतता यांसाठी उत्सुक असलेल्या वाचकवर्गावर याचा इतका पगडा पडला, की अवघ्या वीस वर्षांत अनेक देशांत आणि अनेक भाषांत त्याच्या स्वतंत्र आवृत्त्या निघू लागल्या. भारतातही त्याची स्वतंत्र आवृत्ती सुरू झालेली आहे (१९५४). त्याच्या इतर १३ आवृत्त्या निघतात आणि त्यांचा एकूण खप ३ कोटींच्या आसपास आहे. नियतकालिकसृष्टित हा विक्रम अभूतपर्व आहे.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...