Saturday 7 September 2013

4 दुरदर्शन प्रशिक्षण


दूरचित्रवाणी प्रशिक्षणः दूरचित्रवाणीविषयक सर्व प्रकारचे शिक्षण देण्याकरिता १९७१ मध्ये एक दूरचित्रवाणी प्रशिक्षण केंद्र संयुक्त राष्ट्रांच्या विकासकार्यक्रमांमार्फत नवी दिल्ली येथे १० ऑगस्ट १९७१ पासून कार्यान्वित झाले. आतापर्यंत या केंद्राचा लाभ फक्त आकाशवाणीच्या कर्मचार्यांनाच मिळत होता. देशात ठिकठिकाणी उभारण्यात येत असलेल्या व यावयाच्या दूरदर्शन केंद्रांसाठी तज्ञ मनुष्यबळाच्या आवश्यकतेपायीच या केंद्राची निकड भासली. आतापर्यंत या केंद्रातून सु.३०० प्रशिक्षित कर्मचारी बाहेर पडले आहेत. पुणे येथील भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्थेमध्ये आता हे केंद्र हलविण्यात आले आहे. तीन वर्षांच्या शिक्षणक्रमासाठी सु. १५० विद्यार्थ्यांची या केंद्रात सोय आहे. इतर आशियाई देशातील विद्यार्थ्यांनाही या संस्थेत प्रवेश मिळू शकतो.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन-इझ्रो ) अमेरिकेच्या राष्ट्रीय विमानविद्या व अवकाश प्रशासनाशी (नॅशनल एअरॉनॉटिक्स अँड स्पेस अडमिनिस्ट्रेशन-नॅसा) सप्टेंबर १९६१ मध्ये करार करून भारताच्या ग्रामीण भागातील लोकांना शैक्षणिक कार्यक्रमांचा लाभ मिळवून देण्यासाठी एक उपग्रह एका वर्षासाठी मागितला. याकरिता ९०० लक्ष रु. खर्च लागला.या उपग्रह शैक्षणिक दूरदर्शन प्रयोगाद्वारे (सॅटलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिझन एक्स्पेरिमेंट-साइट) १ ऑगस्ट १९७५ रोजी दूरदर्शनामार्फत शैक्षणिक कार्यक्रमांचा प्रसार सुरू झाला. आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान व ओरिसा ह्या दूरवर पसरलेल्या सहा राज्यांतील २,४०० खेड्यांमधील ३५ लक्ष लोकांना कृषिशिक्षणापासून कुटुंबनियोजन कार्यक्रमांमार्फत सर्व प्रकारच्या शिक्षणाचा लाभ एक वर्षभर मिळू शकला. हा साइटचा कार्यक्रम ३१ जुलै १९७६ रोजी समाप्त झाला. तथापि त्यानंतरही या लोकांना दूरदर्शनाचा लाभ मिळण्याची योजना केंद्र सरकार कार्यान्वित करीत आहे. त्याकरिता सहा राज्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रकरणे भौमिक दूरदर्शक प्रक्षेपक बसविण्यात येणार आहेत. सूक्ष्म तरंगांचे जाळे उभारून राष्ट्रीय दूरदर्शन केंद्रे एकमेकांशी जोडण्याची योजना असून १९७७मध्ये दिल्ली, मुंबई व कलकत्ता ही तीन शहरे सूक्ष्मतरंगांच्या साहाय्याने जोडण्यात येणार असल्यामुळे सु. ८ ते १० महिन्यांत वरील तीन शहरांपैकी एका शहरातून प्रक्षेपित केला जाणारा कार्यक्रम कोणत्याही अन्य दोन शहरांना सहक्षेपित करणे शक्य होईल.
पहिले भू-उपग्रह स्थानक पुण्याजवळील आर्वी येथे उभारण्यात आले आहे. डेहराडूनजवळील लाछीवाला येथे सु.१० कोटी रुपये खर्चून दुसरे भू-उपग्रह स्थानक उभारण्यात आले असून त्याचे उद्घघाटन २५ फेब्रुवारी १९७७ रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले, ह्या भूकेंद्राला दिवंगत राष्ट्रपती अली अहमद यांचे नाव देण्यात आले आहे. हे भूकेंद्र जगातील अत्याधुनिक केंद्रांपैकी एक असून त्यामधील काही विशिष्ट परिवाहांद्वारा (चॅनेल्स) आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी कार्यक्रम पाहता येतील. (चित्रपत्र ३६).

गद्रे. वि. रा.; देशपांडे, सु.र

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...