Saturday 7 September 2013

1 दुरदर्शन

दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम प्रेक्षेपित करणारी भारत सरकारची एक संख्या. माहिती व नमोवाणी खाल्यापासून स्वतंत्र रीत्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम संयोजित करण्यासाठी दूरदर्शन ही संख्या १ एप्रिल १९७६ राजी स्थापन करण्यात आली.

भारतात दूरचित्रवाणीचा विकास १९६० नंतरच विशेषत्वाने घडून आला. सप्टेंबर १९५९ मध्ये पहिले दूरचित्रवाणी केंद्र यूनेस्कोच्या मदतीने प्रायोगिक स्तरांवर दिल्ली येथे सुरू करण्यात आले. प्रथम त्याचे स्वरूप एक मार्गदर्शी दूरचित्रवाणी प्रकल्प असे होते आणि त्यावरून आठवड्यातून फक्त शेक्षणिक कार्यक्रम होत. हळूहळू ते सर्वागांनी परिवूर्ण करण्यात आले.

‘फोर्ड प्रतिष्ठाना‘ तर्फे शेक्षणिक दूरचित्रवाणीचा भारतात कसा प्रसार होईल, हे पाहण्याकरिता एक मंडळ १९६० साली आले. मंडळाने दिल्ली दूरचित्रवाणी व तिचा परिसर यांचा अभ्यास करून भारतातील शैक्षणिक दूरचित्रवाणीकरिता एक आराखडा तयार करून दिला. त्याप्रमाणे माध्यमिक शाळांत नियमित शालेय पाठांचे कार्यक्रम दाखविण्यात येऊ लागेल. १९६५ मध्ये दिल्लीतील सु. २२७ शाळांत (एकूण शाळा ३०७) दूरचित्रवाणीचे संच होते व १९७५ मध्ये ही संख्या जवळजवळ ४२४ च्या घरात गेली (एकूण शाळा ५४९).

दूरचित्रवाणीचा म्हणावा तसा प्रसार १९६५ पर्यंत झाला नाही. त्या वर्षापासून केंद्र सरकारने दूरचित्रवाणीचे जाळे देशात प्रसूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हैंब्रगहुन सहा तज्ञांचे एका मंडळ भारतात आले (ऑगस्ट, १९६५) आणि त्यांनी पहिले आधुनिक दूरचित्रवाणी कलामंदिर भारताच्या राजधानीत उभारले. त्यानुसार सु.२,००० दूरचित्रवाणी संचांस एकाच वेळी दूरदर्शनाचा लाभ होईल आणि त्याचे क्षेत्र ४० किमी. असेल, अशी तांत्रिक व्यवस्था करण्यात आली. याच साली केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवणी खात्याने डॉ. एस्. भगवंतम् यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रवाणी विकास, प्रसार, नवीन पद्धती व तंत्र यांच्या अभ्यासासाठी एक समिती नेमली. या समितीने आपला अहवाल सादर करून सबंध देशभर उच्च दर्जाते दूरदर्शन कार्यक्रम दिसावेत, म्हणून १३ परिवाह योजनेच्या विकासावर (थटींन चॅनेल प्लॅन) भर देण्याचीं आणि दूरचित्रवाणीच्या स्वायत्त निगमासंबंधीची शिफारस केली. त्यानंतर डॉ. अशोक के. चंदा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने १९६४ मध्ये नेमलेल्या दुसर्या समितीने आपला अहवाल १९६६ मध्ये केंद्र सरकारकडे सादर केला. त्या समितीने नभोवाणी व दूरचित्रवाणी या दोहोंसाठी दोन स्वायत्त निगम निर्माण करण्याची शिफारस करून निरक्षरता घालविण्याचे व शिक्षणप्रसाराचे एक प्रभावी साधन म्हणून दूरचित्रवाणीचा सर्व देशभर पुढील दहा वर्षांत झपाट्याने प्रसार करण्यात यावा असे सुचविले. सरकारने या दोन समित्यांच्या काही मौलिक सूचना मान्य केल्या. तथापि दोन खायत्त निगम स्थापण्याची शिफारस स्वीकारली नाही.

उद्दिष्टेः दूरदर्शन संस्थेची उद्दिष्टे आकाशवाणीच्या उद्दिष्टांप्रमाणेच आहेत. देशी, विदेशी बातम्यांचे संकलन करुन बातमीपत्रे प्रक्षेपित करणे. देशाचा योजनाबद्ध सर्वांगीण विकास कसा होईल, याबद्दलचे विचार व माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, शिक्षणाचा प्रसार व प्रचार करणे; प्रत्यक्ष शैक्षणिक धडे, कृषिविषयक प्रात्यक्षिके इ. द्वारा कृषिशिक्षण देणे, कुटुंबनियोजन व तत्संबंधीची माहिती देणे, मनोरंजन करणे वगैरे विविध स्वरूपाची उद्दिष्टे आहेत. मनोरंजन व माहितीकरीता नभोनाट्य, देशी या विदेशी चित्रपट, संगीताचे बहुविध कार्यक्रम, चर्चासत्रे, व्याख्याने वगैरे कार्यक्रम ठेवण्यात येतात.

केंद्रसंख्याः भारतीय दूरदर्शनाची १९३० मध्ये फारच थोडी प्रगती झाली होती. दिल्ली हे एकमेव दूरदर्शन केंद्र अस्तित्वात होते; पण चौथ्या व पाचव्या पंचवार्षिक योजनाकालात दूरदर्शनाचा कार्यक्रम दोन टप्यांत विभागण्यात आला असून तो १९७९ पर्यंत पूर्ण होईल. त्यानुसार पहिल्या टप्यात केंद्राचा दर्जा वाढविण्यात यावयाचा असून सु. ६ नवीन प्रमुख वा मूळ केंद्रे (मदर सेंटर्स) व सहक्षेपण केंद्रे सु. २५० दशलक्ष रू. खर्च करून उभारण्यात यावयाची होती. ही प्रमुख केंद्रे मुंबई, कलकत्ता, जलंदर, लखनौ, मद्रास व श्रीनगर येथे स्थापण्यात येतील, तर सहक्षेपण केंद्रे आसनसोल, अमृतसर, भतिंडा, कानपूर, रसौली, खरगपूर, मसूरी व पुणे या ठिकाणी असतील. यामुळे देशातील १० % भूप्रदेश आणि १७ % लोकसंख्या यांस दूरदर्शनाचा लाभ मिळेल. परंतु १९७४ पर्यंत मुंबई व श्रीनगर येथे प्रमुख केंद्रे आणि अमृतसर व पुणे येथे सहक्षेपण केंद्रे स्थापण्यात आली. पुढे १९७५ मध्ये कलकत्ता, मद्रास व लखनौ येथे प्रमुख दूरदर्शन केंद्रे स्थापन झाली. पाचव्या पंचवार्षिक योजनेत पुढील शहरांत प्रमुख दूरदर्शन व सहक्षेपण केंद्रे स्थापण्याचा माहिती आणि नभोवणी खात्याचा संकल्प आहेः अहमदाबाद, बंगलोर, भोपाळ, कटक, गौहाती, हैदराबाद, जयपूर, पाटणा आणि त्रिवेंद्रम (सर्व प्रमुख केंद्रे); अलाहाबाद, जम्मू, कोल्हापूर, नागपूर, रोहटक, तिरूची, वाराणसी आणि विल्लुपुरम् (सहक्षेपण केंद्रे). १९८२ च्या सुमारास देशात कमीत कमी १०० दूरदर्शन केंद्रे, त्यापैकी प्रमुख ऐंशी सहक्षेपण केंद्रे निर्माण होतील, असे केंद्र सरकारचे धोरण असून त्यांद्वारे देशातील ९० % जनतेस दूरचित्रवाणीचा लाभ मिळेल. यासाठी सु. ३०० कोटी रूपये लागतील, पण नियोजन आयोगाने फक्त ८० कोटी रू. मंजूर केले असल्यामुळे दूरचित्रवाणीच्या विकासावर परिणाम होणे साहजिक आहे.

परवाना शुल्कः दूरचिवाणी संच घरी वापरण्याकरीता प्रतिवर्षी ३० रु. परवाना शुल्क भरावा लागे. उपाहारगृहे, रूग्णालये तसेच इतर सार्वजनिक स्थळीही परवाना शुल्क अधि असून शैक्षणिक संस्थांना, विशेषतः विद्यालये व ग्रंथालय यांना, परवाना शुल्कामध्ये सवलत दिली आहे. १ सप्टेंबर १९७३ पासून दूरचित्रवाणी संचांचे परवाना शुल्क पुढीलप्रमाणे वाढविण्यात आले आहे. घरगुती वापरासाठी ५० रु. ; व्यापारी वापरासाठी १०० रुं; विक्रेत्यासाठी ६० रु. ; प्रात्यक्षिक संच ५० रुपये. परवाना शुल्काची मुदत तसेच परवान्याचे नूतनीकरण यांची मुदत रेडिओ संचाप्रमाणे १ जानेवारी ते ३१ डिसेंबर अशी एका वर्षासाठी असते आणि परवाना शुल्क ३१ डिसेंबरपर्यंत भरावे लागते. काही वेळा परवाना शुल्क भरण्याची सवलत केंद्र सरकारच्या आदेशानुसार वाढविण्यात येते. मुदतीत परवाना शुल्क न भरल्यास विशिष्ट दंड भरावा लागतो. परवाना पुस्तक हरवल्यास परवानाधारकास अधिक आकार देऊन ते पुन्हा घेता येते. विनापरवाना दूरचित्रवाणी संच वापरणे हा गुन्हा असून गुन्हेगारास दंड व शिक्षा यांची कायद्यात तरतूद आहे.

दूरचित्रवाणी संचाच्या परवानाधारकांची संख्या १९६३ मध्ये ५५१ होती, ती ३० सप्टेंबर १९७५ मध्ये ३,६०,१२४ झाली. १९७४ अखेर दूरचित्रवाणी संचांचे वर्गीकरण (मंडले व प्रकार यांनुसार) तक्ता क्र. १ वरून स्पष्ट होईल.जगातील प्रमुख देशांमधील १९७४ सालातील दूरचित्रवाणी संचांची आकडेवारी तक्ता क्र. २ मध्ये दिलेली आहे.

तक्ता क्र. १. दूरचित्रवाणी संचांचे वर्गीकरण (मंडले व प्रकार) 
मंडलाचे नाव
सवलतीचा प्रकार 
घरगुती 
स्वस्त 
समूह 
शाळा 
रुग्णालये 
व्यापारी 
विक्रेता 
एन्. डी. पी. एल्. 
प्रात्यक्षिक 
एकूण 
आंध्र प्रदेश 
 
 
 
 
 
 
 
 
 
दिल्ली 
१,४०,३८१ 
३७३ 
९८७ 
३० 
१,२९५ 
१० 
३२४ 
१,४३,४०० 
जम्मू व काश्मीर 
२,२४० 
१५ 
३७३ 
 
 
३४ 
५३ 
१० 
२,७२५ 
केरळ 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
महाराष्ट्र 
९४,९६७ 
१४० 
६६१ 
२९ 
९७७ 
३० 
 
२४ 
९६,८३२ 
पंजाब 
२५,०२१ 
३४ 
 
४७६
२५,५३८
राजस्थान
१५
१६
तमिळनाडू
१८
उत्तर प्रदेश
६,१३३
३२७
३४
६,४९४
पश्चिम बंगाल
१५२
२३
१७५
ए.पी.एस्.
१९८
२१२
एकूण
२,६९,१२३
५४
८८६
१,६४८
५९
३,१२४
८५
४४
४०१
२,७५,४२४


रचनाः भारत सरकारच्या माहिती व नभोवणी खात्याच्या अखत्याखाली व आकाशवाणीचा एक  विभाग म्हणून दूरचित्रवाणीचे कार्य पूर्वी चालत असे, पण १ एप्रिल १९७६ रोजी दूरदर्शन ही एक स्वतंत्र संख्या स्थापन करण्यात आली, तिचे कार्यविभाग व तंत्रविभाग असे दोन स्वतंत्र विभाग असूनप्रेक्षेपणाची सर्व तांत्रिक बाजू संबंधित तंत्रज्ञ सांभाळतात, तर कार्यक्रमांची रूपरेषा संचालक मंडळ ठरविते. प्रत्येक केंद्राचा प्रमुख केंद्राधिकारी असतो.तो कार्यक्रमांची  देखरेख आणि योजना करतो. 

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...