Saturday 7 September 2013

2 दुरदर्शन कार्यक्रम

कार्यक्रमः दूरचित्रवाणीवरून सादर करण्यात येणारे कार्यक्रम आठवड्यातून २५ तास असतात. शिवाय शाळांकरिता १२ १/२ तासांचा तक्ता क्र. २. प्रमुख देशांमधील दूरचित्रवाणी संच संख्या, १९७४.कार्यक्रम असतो. यात हिंदी व इंग्रजी बातमीपत्रे, राज्यपातळीवर प्रादेशिक बातमीपत्रे (१० तास), विशेष कार्यक्रम (४ तास), मनोसंजन (दोन तास). यांव्यतिरिक्त प्रेक्षकांच्या पत्रांची उत्तरे, देशी आणि विदेशी चित्रपट इ. कार्यक्रमांना वेळ दिला जातो. जवळजवळ ९० टक्के कार्यक्रम भारतातच तयार करण्यात येतात. उरलेल्या कार्यक्रमांची भारत सरकार व दूरचित्रीकरण करणार्या नऊ देशांतून देवघेव करण्यात येते. शेतकर्यांचे जीवनमान सुधारावे तसेच त्यांनी कृषिविषयक नवीन उपक्रम आत्मसात करावेत, धान्योत्पादन वाढावे म्हणून आठवड्यातून दोनदा ' कृषिदर्शन ' कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या बाबतीत युनेस्को या संघटनेने १९६१ मध्ये जॉन विलिंग्ज यांच्या मार्गदर्शनाखाली काही कृषिविषयक कार्यक्रम सुचविले. त्यांत अल्पवेळात दूरचित्रवाणी प्रशिक्षण, कृषिसंशोधन व शेतसंबंधीचे इतर कार्यक्रम होते. दूरचित्रवाणीचे व्यापारीकरण केल्यास महसूल वाढून दूरचित्रवाणीच्या प्रसारास अधिक मदत होईल, असे भगवंतम व चंदा समित्यांनी सुचविले. पण व्यापारीकरणास सरकारचे मत अनुकूल नव्हते. तथापि १ जानेवारी १९७६ पासून १० सेकंद अवधीच्या काही जाहिराती कार्यक्रमांच्या अगोदर व शेवटी दाखविण्यात येऊ लागल्या आहेत. या दहा सेकंदांच्या व्यापारी जाहिरातीचे मुंबई-पुणे दूरदर्शन केंद्रांवरील प्रशुल्क चार हजार रुपये असून पुरस्कारित केलेल्या एका कथापटाचे प्रशुल्क १७,७०० रु. पर्यंत असते. चित्रपटांच्या जाहिराती दूरदर्शन केंद्रांवरून सादर केल्या जात नाहीत.


तक्ता क्र. २. प्रमुख देशांमधील दूरचित्रवाणी संच संख्या, १९७४.
देशाचे नाव 
संख्या 
अमेरिकेची संयुक्त संस्थाने 
११,००,००,०००         (१९७३) 
सोव्हिएट रशिया 
४,९२,००,००० 
जपान 
२,४९,२५,०००            (१९७३) 
प.जर्मनी 
१,८९,२०,०६३ 
ग्रेट ब्रिटन 
१,७६,६५,२८७ 
फ्रान्स 
१,३६,३२,०२६ 
इटली 
१,२५,९६,६७२ 
कॅनडा 
६२,५७,००० 
स्पेन 
६१,२५,००० 
पू. जर्मनी 
४९,६६,५००        (१९७३) 
नेदर्लंड्स
३५,४४,९०९
ऑस्ट्रेलिया
३०,२२,०००
इझ्राएल्
३,८५,०००
भारत
३,६०,१२४            (१९७५)
चीन
३,००,०००

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...