Saturday 7 September 2013

3 दुरदर्शन केंद्र

विविध दूरदर्शन केंद्रेः दिल्ली दूरदर्शन केंद्रः (स्था. १५ सप्टेंबर १९५१). हे प्रतिदिनी ४ तासांचे विविध कार्यक्रम चित्रित करते. या केंद्राचे दृकश्राव्य ६८ किमी. आहे. हिंदी व इंग्रजी या भाषांतून बातम्या व भाष्ये (समीक्षणे) दररोज प्रसारित केली जातात. दर रविवारी हिंदी कथापट, तर दर शनिवारी प्रादेशिक भाषांमधील आणि जुने हिंदी चित्रपट सादर करण्यात येतात. कृषिदर्शन हा खास शेतकर्यांसाठी योजलेला कार्यक्रम आठवड्यातून तीन वेळा दाखविला जातो. हा कार्यक्रम दिल्ली, हरयाणा व उत्तर प्रदेश यांमधील ८६ खेड्यांना समूह दूरचित्रवाणी संचाद्वारा पाहता येतो. मुले, युवक आणि स्त्रिया यांच्याकरिताही स्वतंत्र कार्यक्रम सादर करण्यात येतात.
शालांतर्गत दूरचित्रवाणी कार्यक्रम १९६१ पासून सुरू करण्यात आले. इंग्रजी,गणित, भौतिकी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचे शालेय अभ्यासक्रमाधारित पाठ विद्यार्थ्यांना दूरचित्रवाणीवरून शिकता येतात. ३ मार्च १९७५ पासून दिल्ली दूरदर्शन केंद्राने प्राथमिक शाळांस जाणार्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा अनौपचारिक शालेय पाठ चित्रित करण्यास प्रारंभ केला. हे कार्यक्रम आठवड्यातून दोनदा (सोमवार व मंगलवार) सकळी १०.१५ वाजता सुरू होतात. १९७५ मध्ये प्रथमच उन्हाळ्याच्या सुट्टीत विवध वयोगटांतील विद्यार्थ्यांकरिता दिल्ली दूरदर्शन केंद्राने सकाळच्या वेळी शैक्षणिक कार्यक्रम सादर केला. दिल्ली केंद्रावरून सादर केल्या जाणार्या कार्यक्रमांपैकी ८४ टक्के कार्यक्रम स्वतःच्या कलामंदिरांमध्ये तयार केलेले, २ टक्के कार्यक्रम देशातील इतर केंद्रांकडून मिळविलेले आणि १४ टक्के कार्यक्रम परदेशांतून आयात केलेले असतात. दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रापासून सामान्यतः १०० किमी. अंतरापर्यंत त्याचे कार्यक्रम मिळू शकतात. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये ५,००० किमी. अंतरावरील केंद्राचे कार्यक्रमही मिळाल्याची उदाहरणे काही वेळा घडली आहेत.

मुंबई दूरदर्शन केंद्रः (स्था. २ ऑक्टोबर १९७२). केंद्राचे ग्रहणक्षेत्र ७० ते १०० किमी. च्या दरम्यान आहे. प्रतिदिनी ३ तास कार्यक्रम इंग्रजी, मराठी, गुजराती, हिंदी व उर्दु भाषांमधून सादर करण्यात येतात. शनिवारी व रविवारी अधिक कार्यकम असतात. दररोज इंग्रजी, हिंदी व मराठी भाषांतून तीन बातमीपत्रे (वार्तापट) व हिंदी-मराठीमधून वार्ताभाष्येही (वार्तासमीक्षणेही) प्रसारित होतात. आठवड्यातून दोनदा (सोमवार व गुरूवार) औद्योगिक कामगारांसाठी 'कामगारविश्व' हा कार्यक्रम सादर केला जातो. पुण्यात स्थापन करण्यात आलेला दूरदर्शन केंद्राचा चित्रपट विभाग ग्रामीण भागांना भेटी देऊन ग्रामस्थांकरिता विविध प्रकारचे कार्यक्रम (त्यांत शेतीविषयक कार्यक्रम समाविष्ट) तयार करतो व ते मुंबई आणि पुणे दूरदर्शन केंद्रांवरून दाखविण्यात येतात. आठवड्यातून दोन वेळा क्रीडा समीक्षणे व इतरत्र चालू असलेल्या क्रीडांचे चित्रीकरण सादर केले जाते. शनिवारी प्रादेशिक भाषांमधील कथापट (प्रधानपट) तर रविवारी हिंदी चित्रपट दाखविण्यात येतात.आठवड्यातून एकदा मुलांसाठी चित्रपट सादर केले जातात. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून ८ ऑक्टोबर १९७३ पासून शालेय कार्यक्रम दाखविण्यास प्रारंभ झाला. आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार अशा तीन दिवशी (दिवसातून दोनदा) इंग्रजी आणि विज्ञान विषयांचा प्रत्येकी २० मिनिटांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकरिता सादर करण्यात येतो.

पुणे दूरदर्शन केंद्रः (स्था. २ ऑक्टोबर १९७३). हे केंद्र मुंबई दूरदर्शन केंद्राचे सर्व कार्यक्रम सहक्षेपित करीत असुन त्या केंद्राचे सहक्षेपण क्षेत्र २३,००० चौ. किमी. आहे. पुणे केंद्रावरून प्रेषित केलेले कार्यक्रम सुस्पष्ट आणि रेखीव दिसावेत म्हणून सिंहगडावर उंच प्रेषक व ग्राही आकाशकाकरिता १०० मी. उंचीचा मनोरा उभारण्यात आला आहे. मुंबई केंद्राने प्रेषित केलेला कार्यक्रम, पुणे व मुंबई या केंद्रामध्ये जागोजागी बसविलेल्या अभिचालक दुय्यम केंद्रांद्वारे पुणे येथील आकाशकापर्यंत पोहोचविला जातो. पुणे येथील आकाशक हा कार्यक्रम ग्रहण करून पुन्हा त्याचे प्रेषण करतो. मुंबईपासून येणार्या प्रक्षेपणाची कंप्रता व पुणे येथील आकाशकापासून प्रेषित केल्या जाणार्या कार्यक्रमांची कंप्रता या एकमेकींपासून भिन्न असतात.

श्रीनगर दूरदर्शन केंद्रः (स्था. १६ जानेवारी १९७३). हे केंद्र दररोज ४ तास कार्यक्रम काश्मीरी व उर्दू भाषांमधून आणि दर रविवारी सकाळी आणखी दोन तास जादा कार्यक्रम सादर करते. युवक, स्त्रिया, मुले आणि ग्रामीण समाज यांच्याकरिता विशेष कार्यक्रम सादर केले जातात.

अमृतसर दूरदर्शन केंद्रः (स्था. २९ सप्टेंबर १९७३). यापासून ६५ किमी. अंतरापर्यंत कार्यक्रम ग्रहण करता येतात. प्रतिदिनी इंग्रजी, हिंदी, पंजाबी व उर्दू भाषांमधून तीन तासांचे विविध कार्यक्रम सादर केले जातात. अमृतसरमध्ये उभारण्यात आलेला एक छायाचित्रण विभाग हा पंजाब राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमाचे चित्रिकरण करतो आणि ते कार्यक्रम नंतर अमृतसर केंद्रावरून दाखविले जातात. ग्रामीण जनतेसाठी आठवड्यातून एकदा कार्यक्रम सादर केला जातो. व्यंग्यपट व अनुबोधपट शास्त्रीय मासिक, कोडी व पंजाबी नाटके त्याचप्रमाणे इंग्रजी चित्रपट या केंद्रावरून सादर करण्यात येतात.

कलकत्ता दूरदर्शन केंद्रः हे ९ ऑगस्ट रोजी सुरू झाले. त्याचे कार्यक्रम ४५ किमी. अंतरापर्यंत मिळू शकतात. या केंद्राच्या कार्यक्रमांचा लाभ ६,३५० चौ. किमी. परिसरातील अंतरापर्यंत ११५ लक्ष लोकांना होतो.

मद्रास दूरदर्शन केंद्रः १५ ऑगस्ट १९७५ रोजी हे केंद्र कार्यान्वित झाले. याचा प्रेषक आकाशक १७५ मी. उंचीच्या मनोर्यावर बसविला आहे. या केंद्राचे कार्यक्रम सुस्पष्ट पाहता आणि ऐकता यावेत यासाठी हा बांधण्यात आलेला आहे. या केंद्रावरून सध्यातरी प्रतिदिनी दोन तासांचे कार्यक्रम सादर करण्यात येतात; शनिवारी आणखी अर्ध्या तासाचा अवधी देण्यात येतो.

लखनौ दूरदर्शन केंद्रः हे केंद्र २७ नोव्हेंबर १९७५ रोजी सुरू झाले. भारतातील पृष्ठप्रदेशाला दूरदर्शन कार्यक्रमांचा लाभ मिळवून देणारे लखनौ है पहिले दूरदर्शन केंद्र होय. सध्या या केंद्राचा दूरचित्रीकरणाचा पल्ला (आवाका) ६० किमी. असला, तरी या केंद्राच्या प्रेषक आकाशक मनोर्याची उंची वाढविल्यानंतर तो पल्ला ७५ किमी. पर्यंत जाईल. या केंद्रावरून सादर केल्या जाणार्या कार्यक्रमांत ग्रामीण विभागामिमुख कार्यक्रम अधिक असतात.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...