Saturday 7 September 2013

महाराष्ट्रातील मुद्रणाचा इतिहास व विकास

हाराष्ट्रातील मुद्रणाचा इतिहास व विकास : छत्रपती शिवाजी महाराजांनी एक छापखाना उभारलेला होता; परंतु त्यांना तो चालू करणे शक्य न झाल्याने त्यांनी १६७४ मध्ये तो गुजरातमधील भिमजी पारेख या व्यापाऱ्यास विकला, असे सागंण्यात येते. तथापि यासंबंधी विश्वसनीय असा तत्कालीन पुरावा उपलब्ध झालेला नाही. अठराव्या शतकाच्या अखेरीस मराठी राज्यकर्त्यांच्या लक्षात मुद्रणाचे महत्त्व आलेले होते. नाना फडणीसांच्या प्रयत्नाने तांब्याच्या पत्र्यावर गीतेतील श्लोक कोरून त्यांचे मुद्रण करण्याची योजना आखण्यात आलेली होती. तथापि १८०० साली नाना फडणीस वारले आणि नंतर मराठेशाहीच्या पडत्या काळामुळे या क्षेत्रात त्या वेळी पुढे प्रगती झाली नाही.हाराष्ट्रातील मुद्रणाच्या इतिहासास १८१२ पासून खरा प्रारंभ झाला. त्या वर्षी अमेरिकन मिशनने मुंबई येथे मुद्रणालय सुरू केले. सेरामपूर येथून देवनागरी लिपीचे काही खिळेही त्यासाठी आणविले. त्यावर १८१७ साली छापलेले एक पुस्तक उपलब्ध आहे. या मुद्रणालयात नोकरीस असलेले टॉमस ग्रॅहम हे गोव्याकडील गृहस्थ मातृका तयार करण्यास शिकले. त्यांनी देवनागरी आणि गुजराती लिप्यांचे साचे बनवून त्यांच्या मातृका तयार केल्या व खिळेही पाडले. कॅरी यांनी अनेक जोडाक्षरे बनविली होती. ग्रॅहॅम यांनी मूळ अक्षरांचे काने काढून त्यांची अर्धी अक्षरे वापरून जोडाक्षरे बनविण्याची पद्धतनिर्माण केली. यामुळे लिपीतील जोडाक्षरांची संख्या बरीच कमी झाली. तथापि देवनागरी लिपीची जुळणी या काळात तिमजलीच होती. वरच्या मजल्यात वेलांट्या, मात्रा, अनुस्वार इ.; मधल्या मजल्यात मुळाक्षरे व काने इ. आणि खालच्या मजल्यात उकार, ऋकारादी चिन्हे अशी असत आणि त्यांची एकत्रित तिमजली जुळणी करावी लागत असे. त्यासाठी देवनागरी लिपीचे खिळे दोन वेगवेगळ्या साच्यांवर पाडावे लागत. मुळाक्षरांसाठी जेवढी उंची लागे त्याच्या निम्म्या उंचीच्या मात्रा, वेलांट्या, उकार व ऋकार हे पाडले जात. जुळणी करताना वेलांट्या, मात्रा उकार इ. कान्याच्या टोकाशी जुळते असावे लागत. त्यासाठी जागोजाग कमी उंचीचे खिळे (डिग्री) वापरून मधली जागा भरून काढावी लागे. त्यासाठीही दोन प्रकारचे कमी उंचीचे साचे लागत. एक डिग्री खिळ्याकरिता व दुसरा दोन शब्दांमधील पट्टीकरिता. यांशिवाय आकडे. विरामचिन्हे यांच्यासाठी पूर्ण उंचीचा साचा लागे. अशा रीतीने निरनिराळ्या लांबी-रुंदीत पाडलेले हे खिळे एकत्र तिमजली पद्धतीने जुळविणे आणि मात्रा, वेलांट्या व उकार कान्याच्या टोकाशी बरोबर बसविणे हे काम जिकरीचे होई. तथापि अशाही पद्धतीने त्या काळात जुळणीचे काम केले जात असे आणि अद्यापही काही छापखान्यांत या पद्धतीचा अवलंब केला जात आहे.



मेरिकन मिशनच्या मुद्रणालयात मुद्रणाचे काम करणारे गणपत कृष्णाजी पाटील हे ग्रॅहॅम यांच्याकडून मातृका तयार करण्यास शिकले व १८२७ मध्ये त्यांनी स्वतःचे मुद्रणालय सुरू केले. तेथे चुनखडकावरून समपृष्ठ पद्धतीने छपाई करीत. अमेरिकन मिशन मुद्रणालयातील अशाच यंत्रावरून पाटील यांनी आपले यंत्र येथेच बनविले व त्यावर पंचांग छापले. त्यानंतर त्यांनी  खिळ्यांचे अक्षर मुद्रणालयही सुरू केले. त्यासाठी त्यांनी देवनागरी व गुजराती अक्षरांचे खिळे पाडून घेतले. जावजी दादाजी चौधरी हेही ग्रॅहॅम यांच्याजवळ मातृका तयार करण्यास व त्यांपासून खिळे बनविण्यास शिकले. या वेळेपर्यंत खिळे पाडण्याची यंत्रे यूरोपात बनू लागली होती व त्यांचा वापर येथेही सुरू झालेला होता. पुढे जावजी दादाजी यांनी १८६४ मध्ये स्वतःची खिळे ओतण्याची ओतशाळा व १८६९ मध्ये निर्णयसागर मुद्रणालयही सुरू केले. राणोजी रावजी आरू हे त्यांना मातृका तयार करून देत त्यांच्या मातृकांचे वळण प्रमाणबद्ध, रेखीव व सुबक असल्याने जावजी दादाजींच्या खिळ्यांच्या ओतशाळेला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.

या काळात खिळे पाडण्याच्या व जुळणीच्या पद्धतीत सुधारणा झाली. जुळणी सुकर होण्यासाठी उकार-ऋकाराचा मजला काढून टाकून कु-कू, खु-खू, कृ, गृ वगैरे अक्षरे बसविण्यात आली. यासाठी आणखी एका साच्याचा उपयोग करावा लागला. यामुळे पूर्वी पाच प्रकारचे साचे लागत त्या जागी सहा लागू लागले. उकार-ऋकारादिकांची स्वतंत्र ओळ बनविण्याची यामुळे जरूरी राहिली नाही पण मात्रा, वेलांट्या वगैरे बरोबर कान्यावर जोडण्याचे किचकट काम शिल्लकच राहिले. ते टाळण्यासाठी निर्णयसागर ओतशाळेने कि-की-के, खि-खी-खे अशी वेलांट्या-मात्रांसह अक्षरे बनविली. यामुळे जुळणी सोपी झाली; पण देवनागरी लिपीतील खिळ्यांच्या संचातील संख्या वाढली. त्यामुळे खिळे ठेवण्याच्या कप्प्यांच्या पेटीच्या रचनेतही बदल करणे भाग पडले.

या काळात लायनोटाइप यंत्र तयार झाले होते व इंग्रजी वर्तमानपत्रांतून त्याचा वापर सुरू झाला होता. या यंत्राचा देवनागरी लिपी जुळविण्याच्या कामी उपयोग करण्याकडे अनेक संशोधकांचे लक्ष लागले होते. देवनागरी लिपी यांत्रिक पद्धतीने जुळवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सु. पन्नासावर लोकांनी प्रयत्न केले व वेगवेगळ्या योजना सुचविल्या. भारतात यांत्रिक प्रगती फारशी झालेली नसल्यामुळे परदेशात तयार झालेल्या यंत्रावरच आपली लिपी कशी बसविता येईल या दृष्टीने विचार केला जात असे. देवनागरी लिपीची तिमजली जुळणी ही मुख्य अडचण होती. रोमन अक्षरांची जुळणी एकापुढे एक अक्षर टाकून करता येते व त्यांच्या डोक्यावर किंवा खाली अन्य चिन्हे येत नाहीत. लायनोटाइप यंत्रावर ९० प्रकारच्या मातृका बसविलेल्या होत्या, तर देवनागरी लिपीतील अक्षरांची संख्या पुष्कळच अधिक होती. लोकमान्य टिळकांनी यावर सुचविलेल्या योजनेत ११३ (म्हणजे २३ जास्त) मातृका लागत होत्या; पण टिळकांना राजकीय कार्यामुळे या योजनेकडे लक्ष देणे पुढे शक्य झाले नाही. मध्यंतराच्या काळात मोनोटाइप यंत्रे तयार झालेली होती. या यंत्रावर २२५ अक्षरे बसू शकत होती म्हणून टिळकांनी या यंत्रावर देवनागरी लिपी बसविण्याच्या दृष्टीने नवीन योजना आखली व त्या दृष्टीने मातृका तयार करून खिळे पाडले. पण पुढे १९२० मध्ये टिळक दिवंगत झाल्याने ही योजना पूर्ण झाली नाही. तथापि त्यांचे हे काम कृ. के. गोखले यांनी पुढे चालविले. पण त्यांनी मोनोटाइप कंपनीशी पत्रव्यवहार करून सुचविलेल्या योजनेत काही दोष आढळल्याने ती व्यवहार्य ठरली नाही. यामुळे लिपीच्या वळणातच बदल करावा या दिशेने संशोधक नवनव्या योजना सुचवीत गेले. विनायक दामोदर सावरकर व गजानन भास्कर वैद्य यांनी मात्र आपआपल्या योजनांनुसार खिळेही बनविले होते; परंतु लायनोटाइप व मोनोटाइप यंत्रावर देवनागरी लिपी बसविण्याच्या दृष्टीने नंतर काही काळ प्रयत्न झाले नाहीत. या काळात देवनागरी लिपी यंत्रावर बसत नाही असे गृहीत धरून देशी भाषांकरिता रोमन लिपी वापरावी हा विचार सुरू झाला. सरकारने सैन्यातील लोकांसाठी हिंदी भाषेतील रोमन लिपीचा वापरही सुरू केला. तेव्हा पुन्हा देवनागरी लिपी यंत्रावर बसविण्याचे प्रयत्न सुरू झाले. शंकर रामचंद्र दाते यांनी टिळकांनी १९०४ मध्ये सुचविलेली व ज्याप्रमाणे खिळे तयार केलेली योजना अभ्यासली. या काळात जर्मनीत टायपोग्राफ नावाच्या यंत्रावर एका मातृकेवर दोन दोन अक्षरे बसविण्यात आली होती, त्यामुळे १८० अक्षरांत देवनागरी लिपीची जुळणी चांगल्या रीतीने करणे शक्य आहे असे दाते यांना वाटले व त्यांनी या दिशेने प्रयत्न केला. पण टायपोग्राफ कंपनीने हे काम करण्यास नकार दिला. पुढे दाते यांनी लंडनला जाऊन मोनोटाइप कंपनीच्या संचालकांना आपली योजना सांगितली. या कंपनीने पूर्वी केलेल्या प्रयत्नांतील दोषांच्या संबंधांतील चर्चेनंतर दाते यांनी कर्णाची सध्याची पद्धती सुचविली. त्यांच्या सूचनेप्रमाणे मोनोटाइप कंपनीने नमुन्याचे खिळे तयार केले. ही योजना यशस्वी ठरली व १९३१ च्या अखेरीस मोनोटाइप यंत्रावर देवनागरी लिपीची जुळणी शक्य झाली. दाते यांच्या कर्ण पद्धतीचा अवलंब करून भारतातील मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, तमिळ, कन्नड वगैरे अनेक भाषांच्या मातृका बनवून यांत्रिक जुळणी शक्य झाली आहे. विद्यमान लिपीच्या स्वरूपात बदल न करता देवनागरी व इतर भारतीय लिप्या आता यांत्रिक पद्धतीने जुळविल्या जात आहेत.
त्यानंतर १९३४ मध्ये हरगोविंद गोविल यांनी स्वतंत्रपणे प्रयत्न करून अमेरिकेत लायनोटाइप यंत्रावर देवनागरी लिपी बसविली. तथापि त्यांच्या योजनेत मात्रा, उकार व वेलांट्या यांचा फार संकोच करावा लागत असल्याने त्यात लिपीच्या सौंदर्याची हानी झाली आहे, तथापि ती टाळून टिळकांच्या योजनेचा स्वीकार करून थोड्या फार फरकांसह देवनागरीच्या वळणात दोष निर्माण न होऊ देता ती लायनोटाइप यंत्रावर बसविता येणे शक्य आहे. वर्तमानपत्रांना लायनोटाइप यंत्र अधिक उपयुक्त असल्याने त्या यंत्राचा व तत्सदृश इंटरटाइप यंत्राचा वापर देवनागरीसाठी सध्या केला जात आहे. लिपीच्या सौंदर्याची हानी पत्करूनही ते यंत्र वापरले जात आहे. यावरून त्याची आवश्यकता किती आहे, हे दिसून येते.


का बाजूने यांत्रिक पद्धतीने जुळणी करणारी यंत्रे निर्माण झाली असता दुसऱ्या बाजूने हातांनी जुळणी करण्याच्या कामाची गती वाढविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू होते. निर्णयसागर ओतशाळेने स्वरचिन्ह जोडून अनेक अक्षरे बनविली होती; पण त्यामुळे खिळे ठेवण्याच्या कप्प्यांच्या पेट्या फार मोठ्या आकारमानाच्या कराव्या लागल्या. यामुळे पुस्तकाव्यतिरिक्त अन्य कामे करणाऱ्यांना एकाच प्रकारच्या खिळ्यात मोठी रक्कम गुंतवावी लागे. त्यावर गुजरात टाइप फौंड्रीने स्वरचिन्हे काटकोनावर पाडण्याची योजना केली. त्यामुळे कान्यावरील स्वरचिन्हे व्यंजनांना जोडून त्यांचे खिळे बनविण्याची आवश्यकता उरली नाही. तथापि या सर्वांच्या योजनांत अक्षरे निरनिराळ्या साच्यांवर पाडावी लागत असल्याने खिळ्यांच्या पेट्यांतील अक्षरांची संख्या पुष्कळच मोठी असे. अक्षरांची संख्या कमी करण्या

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...